breaking-newsTOP NewsUncategorizedगणेशोत्सव-२०२३मनोरंजनमहाराष्ट्र

एक्झर्बिया अबोड गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजित नृत्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

  • एकेरी व दुहेरीनृत्य प्रकार तसेच समूह नृत्याने रंगलेली ही स्पर्धा उपस्थित तरुणांचे आकर्षण ठरली

। वडगाव (मावळ) । महान्यूज । गणेश क्षिरसागर ।

जांभुळगाव येथील एक्झर्बिया अबोड गणेशोत्सव मंडळातर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून 5 सप्टेंबर रोजी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. युवकांना मोठ्या उत्साहात थिरकायला लावणाऱ्या या नृत्य स्पर्धेमध्ये जुन्या व नवीन हिंदी मराठी चित्रपटांच्या गीतावर स्पर्धकांबरोबर विद्यार्थीप्रेक्षकही थिरकले. ‘मल्हारी’ पासून ‘ पिंगा ग पोरी पिंगा‘, ‘उधळ उधळ’ पासून चंद्रा, ‘काला चष्मा’ पर्यंत अनेक रंगतदार गीतांवर तसेच रॅप गाण्यांवर नृत्यकला सादर करण्यात आली. क्लासिकल, वेस्टन, रीमिक्स अशा विविध प्रकारच्या गीतांवर तरूणाईने मोठ्या उत्साहात जल्लोष केला. एकेरी व दुहेरीनृत्य प्रकार तसेच समूह नृत्याने रंगलेली ही स्पर्धा उपस्थित तरुणांचे आकर्षण ठरली. धमाल नृत्याला मिळणारी तरुणाईची दाद आणि नृत्य सादरीकरणातील लक्षणीय पदलालित्याने एक्झर्बिया अबोडवासियांच्या चेहर्यावर कमालीचा उत्साह, आनंद पहायला मिळाला.

सदर स्पर्धेला परिक्षक म्हणून काजल पुरी, रवीना वाणी, सोहेल शेख आदींनी आपले योगदान दिले. तर वडगाव मावळ येथील रमेशकुमार सहानी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता दहावीत शिकत असलेली श्रद्धा कासार हिने खुमासदार सूत्रसंचालन करत प्रेक्षकांची मने जिंकली. स्पर्धेचा निकाल 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी 8.30 वाजता जाहीर होणार असल्याचे गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष धनंजय वाणी, उपाध्यक्ष दीपक पाटील, खजिनदार पंढरीनाथ हिंगे, सतिश कदम, सचिन कासार यांनी सांगितले. या स्पर्धेत स्वरा, अनन्या, अनशुमन चव्हाण, धनश्री ससाणे, वेदांतका दिसले, गणपबती बाप्पा मोरया ग्रुप, सिद्धी, आरोही, श्रृती कासार, रोशनी खेडकर, विणा भोरे, विहान भोरे आदींनी सहभाग नोंदविला. रचना-सपना यांनी ड्युएट नृत्याचे सादरीकरण केले. तर स्वरांजली पाखरे हिने अतिशय आत्मविश्वासपूर्वक नृत्य सादरीकरण केले.

मिस्टर अॅण्ड मिसेस कदम यांचा झिंगाट परफॉर्मन्स
धनश्री ग्रुपच्या 7 क्रू मेंबर्स, वेदांतिका दिसले हिने पिंगा या गाण्यावर केलेला बहारदार परफॉर्मन्स सर्वांच्याच कौतुकाचा विषय ठरला. प्रतिक्षा, रचना, सपना, अनुष्का, साक्षी पवार, सिद्धी बेतावडकर, विघ्नहर्ता ग्रुप, आदींनी नृत्य स्पर्धेला आपला सहभाग नोंदविला. एक्झर्बिया अबोडवासियांसाठी ओपन टू ऑल या कॅटेगरीत लहान-थोर, सर्वांनीच झिंगाट या गाण्यावर ठेका धरला. तर मिस्टर अॅण्ड मिसेस सतिश कदम यांनी झिंगाट परफॉर्मन्स सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button