TOP Newsपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती… फुगेवाडीत महापालिकेच्या माध्यमिक विद्यालयात २५ वर्षानंतर विद्यार्थी-शिक्षकांचा स्नेहमेळावा उत्साहात

पिंपरी :
अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती
दोन दिसांची रंगत संगत, दोन दिसांची नाती
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक विद्यालय फुगेवाडीचा सन १९९७-९८ च्या माजी विद्यार्थी शिक्षक स्नेहमेळावा सुमारे २५ वर्षानंतर आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास विद्यार्थी, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

माध्यमिक विद्यालयात सन १९९७-९८ मध्ये दहावीत असलेले माजी विद्यार्थ्यांनी २५ वर्षानंतर पुन्हा एकत्र येत ०४ जून २०२३ रोजी विद्यालयाच्या प्रांगणात माजी विद्यार्थी व शिक्षक स्नेहमेळाव्याला ४० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींचा आणि शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. तुम्ही दुसऱ्याच्या वाटेतील मार्गदर्शक व्हा. असा मोलाचा संदेश कार्यक्रमाच्या अध्यक्षा रोहिणी इनामदार मॅडम यांनी विद्यार्थ्यांना आपल्या अध्यक्षीय भाषणात दिला.

यावेळी सर्व माजी विद्यार्थी – शिक्षक २५ वर्षानंतर एकत्र भेटल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. तर अनेकांनी ही भेट आणि या आठवणी पुढील आयुष्यभर प्रेरणा आणि उत्साह देत राहतील, अशा प्रकारे आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेच्या उपमुख्याध्यापिका रोहिणी इनामदार मॅडम, शिक्षक विठ्ठल एकशिंगे सर, सतीश पाटील सर, मधुकर भिसे सर, सुरेखा पाटील मॅडम, अनिता बगाटे मॅडम, नयना काकडे मॅडम तसेच विद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी श्रीमती लक्ष्मी फंड, श्रीमती समिंद्रा नाणेकर, सौ. विजया पोंगडे, सुरक्षारक्षक श्री चंद्रकांत राऊळ उपस्थित होते.

माजी विद्यार्थ्याच्या हस्ते सर्व शिक्षकांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यानंतर शिक्षकांचे मनोगत, प्रमोद गोलांडे, विशाल सोनवणे, सविता फंड या विद्यार्थ्यांचे मनोगत व्यक्त केले.
या स्नेहमेळाव्याचे नियोजन विद्यालयाचे माजी विद्यार्थी पै. तुषार फुगे, संदीप बांबे, संजय सिंग, राहुल गायकवाड, प्रशांत देवकर, निलेश दहीवाळ, प्रविण हरिहर, दीपक इंगळे, कमल तुपे, कविता जाधव, शितल वहिले, आशा गावडे यांनी पुढाकार घेऊन आयोजन केले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button