breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अश्लील गाणी लावून तरुणीवर पैसे उधळले; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

पिंपरी |महाईन्यूज|

मावळातील एका फाॅर्महाऊसवर डीजेवर गाणी लावून त्यावर अश्‍लिल हावभाव करून नाचणाऱ्या 4 महिला आणि महिलांवर पैसे उधळत असलेल्या पाच जणांविरोधात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कारवाई करीत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मळवली परिसरातील एका बंगल्यात बीभत्स नृत्य होत असल्याची माहिती शुक्रवारी (दि. 9) पोलिसांना माहिती मिळाली. मळवली गावच्या हद्दीतील समृद्धी व्हिला येथील बंगल्यामध्ये 5 पुरुष व 4 महिला असे “स्पीकर’वर गाणी लावून त्यावर अश्‍लिल हावभाव करून नाचत आहेत. तसेच या महिलांवर पुरुष पैसे उधळत आहेत.

लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सहायक पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप घोरपडे, पोलीस नाईक विजय रहातेकर, पोलीस शिपाई शरद जाधवर, महिला पोलीस शिपाई रूपाली कोहिनकर व दोन पंच यांनी बातमीचे ठिकाणी जाऊन खात्रीकरून रात्री सव्वाअकराच्या सुमारास छापा टाकून सर्वांना रंगेहाथ पकडले.

या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या पुरुषांची नावे राजेश पारसमल जैन (रा. लॅमिंग्टन रोड, मुंबई), महेश छगनलाल पोरवाल, विनोद कुमार मोहनलाल भन्साळी, सचिन रमेश जैन आणि राकेश मदनलाल पोरवाल (सर्व रा. बिजापूर, कर्नाटक) अशी नावे आहेत.

पोलिसांनी उधळलेले रोख रक्‍कम 50 हजार 880 रुपये, मोबाईल स्पीकर असे एकूण एक लाख 40 हजार 880 रुपयांचा माल जप्त केला आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याला 5 पुरुष व 4 महिला यांच्याविरुद्ध भा.द.वि. कलम 294, 188, 269 साथीचे रोग नियंत्रण कायदा सन 1897 चे कलम 3 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135, 33(छ)/131 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सहायक पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी आवाहन केले आहे की, यापुढे असा प्रकार घडताना मिळून आल्यास संबंधित लोक व बंगला मालक यांचे विरुद्ध कठोर अशी कारवाई केली जाईल.
या प्रकरणी पोलीस हवालदार सिताराम बोकड तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button