breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

गणेशोत्सव देखाव्यातून विद्यार्थ्यांना उमगले ‘जी-20’ महत्त्व

गायत्री इंग्लिश मीडिअम स्कूलचा अनोखा देखावा

संस्थापक अध्यक्ष विनायक भोंगाळे यांची संकल्पना

पिंपरी । प्रतिनिधी

भारताने नेतृत्व केलेल्या ‘जी-20’ परिषदेचे चित्रण व महत्त्व गणेशोत्सव देखाव्यातून गायत्री इंग्लिश मिडीयम स्कूलने उभारले. या परिषदेतून जागतिक स्तरावर भारताचा नावलौकिक कसा झाला? या देखाव्यातून विद्यार्थ्यांमध्ये जी-20 बाबत जनजागृती करण्यासाठी स्कुलने पुढाकार घेतला. या देखाव्याचे पालकवर्गांत कौतुक होत आहे.

गायत्री इंग्लिश मीडियम शाळेचे संस्थापक अध्यक्ष विनायक भोंगाळे यांच्या पुढाकाराने विशेष उपक्रमाचे आयोजन केले जाते. शाळेमध्ये केवळ पुस्तकी शिक्षण न देता व्यवसायिक शिक्षण देण्यावर भर दिला जात आहे. त्या दृष्टीकोनातून यंदा गणेशोत्सवात जी- 20 ही संकल्पना ठेवली होती. यामध्ये समाविष्ठ असणाऱ्या सर्व देशाचे ध्वज लावण्यात आले होते. त्या संबंधित सर्व माहिती लावण्यात आली. सर्व शिक्षकांना ही माहिती वर्गात देवून त्या विषयावर लिखान करुन देण्यास सांगून स्पर्धा घेण्यात आली.

हेही वाचा – ‘राष्ट्रपिता महात्मा गांधींचा पुतळा शहरात नसणे ही खेदाची बाब’; इम्रान शेख

या उपक्रमाचे संस्थाचे अध्यक्ष विनायक भोंगाळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच सेक्रेटरी, व्यवस्थापकीय संचालक, विश्वस्थ, विशेष कार्यकारी अधिकारी यांनी कौतुक केले.

जी-२० हा जगातील २० प्रमुख देशांच्या अर्थमंत्री व मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरांचा एक गट आहे. वास्तविकपणे या गटात १९ देश व युरोपियन संघाचा सहभाग आहे. युरोपीय परिषदेचे अध्यक्ष व युरोपीय मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष युरोपियन संघाचे जी-२० मध्ये प्रतिनिधित्व करतात. जी-२० सदस्य देशांचा एकत्रित जीडीपी जगाच्या ८५ टक्के आहे व हे २० देश एकूण जागतिक व्यापाराच्या ७५ टक्के व्यापारासाठी कारणीभूत आहेत. 2008च्या सुरुवातीच्या बैठकीपासून जी -20 देशांच्या प्रमुखांनी ठरावीक कालावधीत परिषदेत वेळोवेळी सहभाग घेतला आहे. अलिकडच्या वर्षांत आपल्या कार्यसूचीच्या विस्तारामुळे या गटामध्ये वित्त मंत्री आणि परराष्ट्र मंत्र्यांची स्वतंत्र सभा देखील आयोजित केली जातात.

इंडोनेशियातील बाली शिखर परिषदेत दि. 1 डिसेंबर 2022 रोजी भारताला जी-20 समिट इंडिया 2023 चे अध्यक्षपद देऊ करण्यात आले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतातील कार्यक्रमाचे अध्यक्षपद सोपवण्यात आले. भारताने या कार्यक्रमाचे आयोजन करून जगात आपली ताकद सिद्ध केली. त्याबाबत विद्यार्थ्यांना माहिती व्हावी. त्यांना त्याचे महत्त्व कळावे. याकरिता जी-20 चा देखावा केला. यावर्षी गणेशोत्सव अत्यंत दिमाखात साजरा झाला.

विनायक भोंगाळे, संस्थापक अध्यक्ष, गायत्री इंग्लिश मीडियम स्कूल. भोसरी.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button