पिंपरी l प्रतिनिधी
आईच्या प्रियकराने तरुणीवर ती अल्पवयीन असल्यापासून अत्याचार केला. याबाबत विचारणा केली असता त्याने तरुणीला मारहाण केली. तसेच तरुणी आणि तिच्या आईला मारून टाकण्याची धमकी दिली. हा धक्कादायक प्रकार सन 2014 पासून 11 एप्रिल 2022 या कालावधीत तळेगाव दाभाडे येथील एका लॉजवर, भंडारा डोंगराच्या जंगलात आणि पिडीत तरुणीच्या घरी घडला आहे.
याप्रकरणी 40 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत 21 वर्षीय तरुणीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी तरुणीच्या आईचा प्रियकर आहे. त्याचे फिर्यादीच्या घरी येणे-जाणे असते. आरोपीने सन 2014 पासून 11 एप्रिल 2022 या कालावधीत फिर्यादी तरुणीवर बलात्कार केला. याबाबत फिर्यादीने आईला सांगितले असता आरोपीने फिर्यादी तरुणी आणि तिच्या आईला शिवीगाळ करून मारहाण केली.
फिर्यादी तरुणी अल्पवयीन असल्यापासून आरोपी तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत असून तरुणीला व तिच्या आईला मारून टाकण्याची धमकी देत असल्याची धक्कादायक माहिती तरुणीने फिर्यादीत दिली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.