ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भागीदार म्हणून संस्थेत घेत नफा न देता 1.30 कोटी रूपयांची फसवणूक

पिंपरी चिंचवड | भागीदारी संस्था स्थापन करून 1.30 कोटी रूपये स्विकारून संस्थेत एकास भागीदार म्हणून घेतले. वेगवेगळ्या कागदपत्रांवर सही घेतली तसेच प्रकल्पातील गाळे परस्पर विकून त्याचा नफा इसमाला न देता त्याची फसवणूक केली. 22-07-2016 ते 18 फेब्रुवारी 2022 दरम्यान किवळे, देहरोड येथे ही घटना घडली. याप्रकरणी तीन आरोपींना देहुरोड पोलिसांनी अटक केली आहे.

संदीप दिनदयाल अगरवाल, सचिन दिनदयाल अगरवाल, सुमित दिनदयाल अगरवाल आणि कपील सतपाल अगरवाल असे गुन्हा दाखल चार आरोपींची नावे आहेत. त्यापैकी संदीप, सचिन आणि सुमित अगरवाल अटक आहेत.

रोहीदास शामराव तरस (वय 43, रा. किवळे, हवेली) यांनी याप्रकरणी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी किवळे येथील सर्व्हे नंबर 11/3/1 येथील जमिनीवर विकसनासाठी भागीदारी संस्था श्री साई रियालिटी, श्री साई इन्फोटेक, श्री साई बिल्डटेक नावाच्या भागीदारी संस्था स्थापन केल्या. यामध्ये फिर्यादीला भागीदार म्हणून घेत 1 कोटी 30 लाख रूपये भाग भांडवल घेतले.

सुरवातीपासून फिर्यादी यांना फसविण्याच्या उद्देशाने आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार केले. डीड ऑफ रीटायरमेंट वरती देखील फिर्यादी यांची सही घेतली. आरोपींनी प्रकल्पातील गाळे विकून त्याचा अंदाजे चार कोटी नफा फिर्यादीला दिला नाही. फिर्यादी यांचा विश्वासघात करून खोटे दस्तऐवज तयार केले असे फिर्यादीत नमूद केले आहे. तीन आरोपी अटक असून, देहुरोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button