TOP Newsक्रिडाटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपमुंबईराष्ट्रिय

वानखेडे स्टेडिअममध्ये क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा पुतळा; ५० व्या वाढदिवशी MCA कडून मिळणार मोठं गिफ्ट

मुंबई: भारताचा मास्टर ब्लास्टर खेळाडू सचिन तेंडुलकर आता कायमच आपल्याला वानखेडे स्टेडियममध्ये पाहायला मिळणार आहे. हे ऐकून तुम्ही थोडे चकित नक्कीच व्हाल पण यामागचं कारणही अगदी तसंच आहे. मुंबईतील प्रसिद्ध वानखेडे स्टेडियममध्ये वानखेडे स्टेडिअममध्ये क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोठा पुतळा बसवण्यात येणार आहे. याच मैदानावर या महान फलंदाजाने भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. लवकरच प्रत्यक्षात हा पुतळा पाहायला मिळणार आहे.

येत्या २३ एप्रिलला भारताचा मास्टर ब्लास्टर खेळाडू आपला ५० वा जन्मदिवस साजरा करणार आहे. त्यामुळे क्रिकेट अधिकार्‍यांच्या मते, या पुतळ्याचे अनावरण २३ एप्रिल, सचिन तेंडुलकरच्या ५० व्या वाढदिवसादिवशी किंवा या वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान केले जाऊ शकते. एप्रिलमध्ये हा पुतळा स्थापित केल्यास, मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना आयपीएल २०२३ दरम्यान हा पुतळा प्रत्यक्षात पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष अमोल काळे यांनी इंडियन एक्सप्रेसला माहिती देताना घोषणेची पुष्टी केली. वानखेडे स्टेडियमवर हा पहिलाच पुतळा असेल, तो कुठे ठेवायचा हे आम्ही ठरवत आहोत, असेही ते म्हणाले. पुढे ते म्हणाले, “तो (सचिन तेंडुलकर) भारतरत्न आहे आणि त्याने क्रिकेटसाठी काय केले हे सर्वांना माहीत आहे. तो ५० वर्षांचा झाल्यावर, हे MCA कडून कौतुकाचे एक छोटंसं गिफ्ट असेल. मी तीन आठवड्यांपूर्वी त्याच्याशी बोललो आणि त्याची संमती घेतली.”

सचिन तेंडुलकरने भारताकडून २०० कसोटी सामने, ४६३ एकदिवसीय आणि एक टी-२० सामना खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावा करण्याच्या बाबतीत, त्याच्याकडे सर्वाधिक धावा (३४,३५७) आणि १०० शतके आहेत.

वानखेडेमध्ये सचिन तेंडुलकरच्या नावाने एक स्टँड पूर्वीपासूनच आहे. एमसीएने गेल्या हंगामात सुनील गावस्कर यांच्या स्मरणार्थ कॉर्पोरेट बॉक्स आणि दिलीप वेंगसरकर यांच्या सन्मानार्थ स्टँड समर्पित करण्याचा निर्णय घेतला. देशभरातील स्टेडियममध्ये क्रिकेटपटूंचे फार मोठे पुतळे नाहीत. इंदूरमधील होळकर स्टेडियम, आंध्र प्रदेशमधील व्हीडीसीए स्टेडियम आणि विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम येथे माजी भारतीय महान सीके नायडू यांचे तीन वेगवेगळे पुतळे आहेत.

सचिन तेंडुलकरचा पुतळा वानखेडे येथे करण्यात येणार आहे, या घोषणेनंतर सचिनने ANI शी बोलताना यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली, ‘माझ्यासाठी एक छानसं सरप्राईज आहे. माझ्यासोबत जेव्हा ही कल्पना जेव्हा शेअर केली तेव्हा मी सरप्राईज झालो. माझ्या कारकिर्दीची सुरुवात इथे झाली. खूप आणि कधी ही न विसनत्य आठवणी इथे आहेत. त्याचसोबत सर्वात मोठा क्षण माझ्यासाठी होता तो म्हणजे वानखेडेमध्ये २०११ चा विश्वचषक जिंकला होता.’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button