‘हा पवित्र क्षण प्रत्येकासाठी फलदायी ठरो’; आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधानांनी जनतेला दिल्या शुभेच्छा….

नवी दिल्ली : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा देताना म्हटले आहे की “आपण भगवान विठ्ठलाची प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांवर त्यांचे आशीर्वाद कायम राहोत, अशी कामना करतो.”
यासंदर्भात पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “देशवासियांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा. हा पवित्र क्षण प्रत्येकासाठी फलदायी ठरो हीच कामना.”
हेही वाचा –वडाळा येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक पूजा संपन्न
पुढे त्यांनी म्हटले आहे की, “आषाढी एकादशीच्या या पवित्र दिनाच्या मनोभावे शुभेच्छा! आपल्यावर विठ्ठलाचे आशीर्वाद सदैव असेच कायम राहोत हीच विठ्ठलाच्या चरणी आपली प्रार्थना आणि कामना. भगवान विठ्ठल आपल्याला आनंदी आणि समृद्धीमय समाजासाठी मार्गदर्शन करत राहो, आणि आपणही गरीब आणि वंचितांची सेवा करत राहूया.”