Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

एलन मस्क थेट ट्रम्प यांच्याशी भिडणार; नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली; नाव काय?

Elon Musk | अब्जाधीश उद्योगपती आणि टेस्ला-स्पेसएक्सचे सीईओ एलन मस्क यांनी अमेरिकेतील राजकारणात मोठा भूकंप आणला आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ‘अमेरिका पार्टी’ नावाच्या नव्या राजकीय पक्षाची स्थापना जाहीर केली आहे. या घोषणेने अमेरिकेतील प्रस्थापित द्विपक्षीय व्यवस्था (रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट) ला थेट आव्हान दिले आहे, तसेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी त्यांचे वाढते मतभेदही अधोरेखित केले आहेत.

२०२४ च्या निवडणुकीत मस्क हे ट्रम्प यांचे सर्वात मोठे आर्थिक समर्थक आणि जवळचे सहकारी होते. त्यांनी ट्रम्प यांच्या मोहिमेसाठी तब्बल २७.७ कोटी डॉलर्सचा निधी दिला होता. मात्र, ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ नावाच्या कर आणि खर्च विधेयकावरून दोघांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले. मस्क यांनी या विधेयकाला देशाला कर्जाच्या खाईत लोटणारे आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणारे ठरवले. ट्रम्प यांनी हे विधेयक मंजूर केल्यानंतर मस्क यांनी सरकारी दक्षता विभाग (DOGE) मधील आपली भूमिका सोडली आणि नव्या पक्षाची घोषणा केली.

हेही वाचा    :    घरात कुत्राही वाघ असतो, हिंमत असेल तर..; भाजपा खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य 

मस्कची ‘अमेरिका पार्टी तंत्रज्ञानप्रेमी, स्वातंत्र्य समर्थक आणि प्रस्थापित विरोधी मतदारांना आकर्षित करू शकतो. हे तेच वर्ग आहेत जे काही प्रमाणात ट्रम्प समर्थक मानले जातात. पारंपारिक राजकारणाव्यतिरिक्त काहीतरी नवीन करण्याचे आश्वासन देणारा नेता म्हणून मस्कची प्रतिमा तयार होत आहे. दरम्यान, विद्यमान राजकीय रचनेवर असमाधानी असलेल्या मतदारांसाठी ही गोष्ट खूप आकर्षक असू शकते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button