Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

घरात कुत्राही वाघ असतो, हिंमत असेल तर..; भाजपा खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

Nishikant Dubey | मुंबईतील मीरा रोड परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) कार्यकर्त्यांनी मराठीत न बोलणाऱ्या एका व्यापाऱ्याला मारहाण केल्याच्या घटनेनंतर राजकीय वातावरण तापलं आहे. या प्रकरणावरून मनसे आणि भारतीय जनता पक्ष (भाजपा) यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, आता भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी प्रतिक्रिया देत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. तसेच दुबे यांनी परप्रांतीयांवरून ठाकरे बंधूंना एक प्रकारे आव्हान देत डिवचलं आहे.

भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी एक्सवर एका पोस्टद्वामार्फत ठाकरे बंधूंना डिवचताना परप्रांतीयांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा. आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो. कोण कुत्रा आणि कोण वाघ, स्वतःच ठरवा, असं निशिकांत दुबे यांनी म्हटलं आहे. तसेच या पोस्टमध्ये निशिकांत दुबे यांनी ही पोस्ट राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाला टॅग केलं आहे.

हेही वाचा    :      ‘हा पवित्र क्षण प्रत्येकासाठी फलदायी ठरो’; आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधानांनी जनतेला दिल्या शुभेच्छा….

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर कठोर भूमिका घेत मराठीच्या नावाखाली गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा मनसेला दिला. त्यांनी सांगितले की, मराठी भाषेचा आदर करणे चुकीचे नाही, परंतु मारहाण आणि दादागिरीला परवानगी दिली जाणार नाही. दोषींविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button