breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

हेरगिरीने नाराज रशियाने चीनला एस-400 क्षेपणास्त्राचे वितरण थांबवले

रशियाने चीनला एस- ४०० क्षेपणास्त्रांचे वितरण थांबवले आहे. वृत्तसंस्था यूएवायर व चिनी वृत्तपत्र सोहू यांनी वृत्तात याला दुजोरा दिला आहे. रशियाने चीनवर हेरगिरीचा आरोप लावल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. रशियाच्या अधिकाऱ्यांनी रशियातील सेंट पीटर्सबर्ग आर्क्टिक सोशल सायन्सेस अकादमीचे अध्यक्ष वालेरी मिट्को यांना चीनला गोपनीय सामग्री देण्याबद्दल दोषी ठरवले आहे. या प्रकरणी वालेरीसह दोन चिनी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. मात्र, वृत्तांत चीनने म्हटले आहे की, वितरण थांबवण्यासाठी रशियावर कोणीतरी दबाव टाकला आहे. यामुळे रशियाने वितरण थांबवले. सध्या चिनी लष्कर कोरोना संकटाचा सामना करण्यात व्यग्र असल्याचे रशियाला वाटते. अशात चिनी लष्कराला सध्या क्षेपणास्त्रे मिळाली तर त्यांची कोरोनाविरोधी कार्यवाही प्रभावित होईल. मात्र, रशियावर कोणी दबाव टाकला याबाबत वृत्तांत काहीही सांगितलेले नाही.

६ महिन्यांत आणखी दोन घटना, यामुळे चीनपासून दूर जातोय रशिया
कोरोना संसर्ग: चीनने महत्त्वाची माहिती लपवली, रशियाने चीन सीमा बंद केल्या
जानेवारीत चीनवर कोरोनाबाबतची माहिती लपवल्याचे आरोप झाले. तरीही डब्ल्यूएचओने चीन येण्या-जाण्यावर बंदी घातली नाही. उलट असे सांगितले की,चीनलगतची सीमा बंद करणाऱ्या देशाला विरोध करण्यात येईल. तरीही रशियाने चीनलगतची सीमा बंद केली. चिनी नागरिकांचा व्हिसाही रद्द केला.

लडाख वाद: भारताविरोधात सहकार्य न केल्याने चीनचा रशियन शहरावर दावा
जुलैच्या सुरुवातीला चीनने रशियाचे शहर व्लादिवोस्तोकवर दावा केला. चीनची सरकारी वृत्तवाहिनी सीजीटीएनने सांगितले की, व्लादिवोस्तोक १८६० च्या आधी चीनचा भाग होता. त्याला रशियाने एकतर्फी करारांतर्गत चीनकडून हिसकावले. लडाख वादात भारताविरोधात त्याला रशियाची मदत न झाल्याने त्याने ही भूमिका घेतली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button