breaking-news

द्वारका चौकातील वाहतूक कोंडीचा गुंता सैल होऊ लागला

नाशिक | महाईन्यूज

शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने द्वारका चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी अवजड वाहनांना प्रवेश बंद तर समांतर रस्त्यांवरील वाहतूक एकेरी केली. यामुळे द्वारका चौकात होणारी कोंडी कमालीची कमी झाली असली तरी, अंतर्गत रिंगरोडसह त्याच्या उपनगरीय जोड रस्त्यांवर वाहतुकीचा ताण अधिक वाढल्याचे चित्र दिसत आहे. हा ताण कमी करण्यासाठी शहर वाहतूक शाखेकडे असलेले मनुष्यबळ अपुरे पडत असल्याचे चित्र आहे.

द्वारकेच्या वाहतूक कोंडीवर मात करता यावी यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी अवजड वाहनांसह बागवानपुरा रस्ता, अनधिकृत रिक्षा, बस थांबे, समांतर रस्ते, एकेरी वाहतूक यासंदर्भात तीन दिवसांपूर्वीच अधिसूचना काढली. या अधिसूचनेच्या अंमलबजावणीला वाहतूक शाखेने सुरुवात केली आहे. त्याचा परिणामदेखील द्वारका चौकात होणा-या वाहतूक कोंडीच्या बाबतीत दिसून येत आहे. चौकात होणारी वाहनांची कोंडी ब-यापैकी सुटल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button