विराट कोहली ‘या’ खेळाडूचा आहे फॅन; म्हणाला, माझ्या घरी एकच जर्सी..

Virat Kohli : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज विराट कोहली सद्या जागतिक क्रिकेटमधील मोठं नाव आहे. विराटचे अनेक चाहते आहेत. मात्र विराट कोहलीचा आवडता खेळाडू कोण आहे. हे आपल्याला माहिती आहे का? याबाबत स्वत: विराट कोहलीने भाष्य केलं आहे. विराटने २०१२ मध्ये पाकिस्तानविरुद्ध १८३ धावा पूर्ण करून केलेल्या विक्रमाच्या आठवणींना उजाळा दिला होता. तसेच कोहलीने आपल्याकडील एका खास गिफ्टची सुद्धा गोष्ट सांगितली.
Virat Kohli's special interview.
– The King. pic.twitter.com/B21pNk3rxe
— Johns. (@CricCrazyJohns) September 5, 2023
विराट कोहली म्हणाला, मी लहानपणापासून सचिन तेंडुलकर यांना माझा आदर्श मानलं आहे. त्यामुळे जेव्हा मी पाकिस्तानासमोर १८३ धावा केल्या तेव्हा सुद्धा त्यांना काय वाटत असेल, ते काय बोलतील असं माझ्या डोक्यात सुरू होतं. माझ्या घरी फक्त एकच जर्सी आहे, माझ्या पहिल्या टेस्ट सेंच्युरीची जर्सी, ज्यावर सचिन तेंडुलकरची सही आहे. याच मुलाखतीत विराटने जागतिक क्रिकेटमध्ये बेन स्टोक्स खेळाडू म्हणून आवडतो असं सांगितलं आहे.
आशिया कप २०२३ स्पर्धेतल्या सुपर ४ फेरीचा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरु आहे. तिसऱ्या गड्यासाठी केएल राहुल आणि विराट कोहली यांच्या १०० धावांची पार्टनरशिप झाली आहे. विराट आणि केएल राहुल दोघांचं अर्धशतक झालं आहे. दरम्यान भारतीय संघाची धावसंख्या २ बाद २३९ आहे. ३९ ओव्हार पुर्ण झाल्या आहेत.




