Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

‘धुरंधर २’ची गायिका Jasmine Sandlas च्या Live Concert मध्ये दुर्घटना; बॅरिकेड कोसळल्याचा व्हिडिओ व्हायरल

Dhurandhar 2 Singer : ‘धुरंधर २’ ची प्रसिद्ध गायिका जॅस्मिन सँडलास हिच्या लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान एक घटना घडली. सध्या ती देशात विविध ठिकाणी म्युझिक कॉन्सर्ट करत आहे. दरम्यान, ती उत्तराखंडमधील डेहराडून येथे परफॉर्मन्ससाठी गेली असता लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान अचानक एक दुर्घटना घडली, ज्यामुळे जॅस्मिनला आपला परफॉर्मन्स मध्येच थांबवावा लागला.

या परिस्थितीला उद्देशून जस्मिन सँडलस म्हणाली, “मला खूप वाईट वाटतंय मित्रांनो; हे असं घडतंय.” या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ‘धुरंधर २’ चित्रपटातील गाणे ‘जाइए सजना’ तिने गायले आहे. त्यानंतर ती जोरदार चर्चेत होती.

२० मे रोजी डेहराडूनमध्ये आयोजित जस्मिन सँडलसच्या कॉन्सर्टदरम्यान, प्रेक्षक थांबलेल्या गर्दीच्या ठिकाणी एक बॅरिकेड कोसळले. यामुळे उपस्थितांमध्ये एकच घबराट उडाली आणि कॉन्सर्ट काही काळासाठी थांबवण्यात आली. सध्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात बॅरिकेड कोसळताच पुढच्या रांगेत उभे असलेले अनेक लोकांचा तोल गेला आणि ते खाली पडले. ही बाब त्यावेळी स्टेजवर उभी असणाऱ्या जस्मिनच्या लक्षात आल्यानंतर तिने तत्का‍ळ कार्यक्रम थांबवला.

हेही वाचा –  ‘शेती कर्ज वाटपाचा विषय बॅंकांनी गांभीर्याने हाताळावा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यावेळी तिने चिंता व्यक्त करत म्हटले की, “मला खूप वाईट वाटतंय मित्रांनो; हे असं घडतंय. माझी टीम याची सूत्रे हाती घेऊ शकेल का? मला हवंय की माझ्या संपूर्ण अंतर्गत टीमने ही परिस्थिती हाताळावी. हे सुरक्षारक्षक खूपच आक्रमकपणे वागत आहेत. माझ्या टीमने ही समस्या त्वरित सोडवावी, अशी माझी इच्छा आहे.” यावेळी ती ‘वाहेगुरु’चा जप करतानाही दिसली.

‘धुरंधर’ आणि दुसऱ्या भागातही जस्मिनने ‘शरारत’, ‘मैं और तू’ आणि ‘जाइए सजना’ ही गाणी गायली, जी प्रचंड व्हायरल झाली आहेत. सलमान खानच्या ‘किक’ (२०१४) या चित्रपटातील ‘यार ना मिले’ या गाण्यामुळे ती लोकप्रिय झाली होती. जस्मिन गुरुद्वारामध्ये ‘शबद’ (भजन) गायची. तिच्यासाठी ते उत्तम माध्यम होते. पण वडील म्हणायचे, केवळ संगी उपजीविकेचे साधन होऊ शकत नाही. यानंतर तिने वडिलांना सांगितले की, उत्तम काम मिळाले तर टिक नाही तर मी सोडेन. पण तिने कधीच हार मानली नाही.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button