Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतून विराट कोहलीची माघार, ‘या’ खेळाडूला मिळाली संधी!

IND vs ENG | भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये उदयपासून म्हणजेच २५ जानेवारीपासून पाच सामन्याच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिल्या दोन सामन्यासाठी बीसीसीआयने विराट कोहलीच्या रिप्लेसमेंटची घोषणा केली आहे.
बीसीसीआयने विराट कोहलीच्या जागी पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी आरसीबीच्या रजत पाटीदार याला स्थान दिले आहे. भारताचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यातून वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली.
विराट कोहलीच्या रिप्लेसमेंटसाठी सरफराज खान याच्या नावाचीही चर्चा होती. पण रजत पाटीदार याला संधी देण्यात आली आहे. सरफराज खान इंडिया अ संघासोबतच राहणार आहे.
हेही वाचा – दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेच्या वेळेसंदर्भात मोठा निर्णय
भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेचं वेळापत्रक :
- पहिली टेस्ट : भारत vs इंग्लंड, २५-२९ जानेवारी, हैदराबाद
- दुसरी टेस्ट : भारत vs इंग्लंड, २-६ फेब्रुवारी, विशाखापट्टणम
- तिसरी टेस्ट : भारत vs इंग्लंड, १५-१९ फेब्रुवारी, राजकोट
- चौथी टेस्ट : भारत vs इंग्लंड, २३-२७ फेब्रुवारी, रांची
- पाचवी टेस्ट : भारत vs इंग्लंड, ७-११ मार्च, धर्मशाला.





