Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! गिल-हार्दिकचे पुनरागमन; ‘या’ खेळाडूला दिला डच्चू

India T20 squad Announce for IND vs SA T20I series : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या वनडे मालिका सुरू असतानाच, बीसीसीआयने ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. रायपूरमध्ये भारत-दक्षिण आफ्रिका दुसऱ्या वनडे दरम्यान हा संघ जाहीर केला. या संघ निवडीतील सर्वात मोठी आणि सकारात्मक गोष्ट म्हणजे दुखापतीतून सावरलेले शुबमन गिल आणि हार्दिक पांड्या यांचे पुनरागमन झाले आहे.

बुधवारी (३ डिसेंबर) रायपूरमध्ये बीसीसीआयच्या निवड समितीच्या बैठकीत टी-२० मालिकेसाठी खेळाडूंच्या निवडीवर चर्चा झाली. विशेष म्हणजे शुबमन गिलला पुन्हा संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे, परंतु त्याचे मालिकेत खेळणे पूर्णपणे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल. दुसरीकडे, या संघातून युवा फलंदाज रिंकू सिंगलला वगळण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा – जेजुरीकरांनी उधळला लोकशाहीचा भंडारा

शुबमन गिल आणि हार्दिक पंड्याचे पुनरागमन

शुभमन गिलला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान मानेला दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला कसोटी आणि वनडे दोन्ही मालिकेतून बाहेर पडावे लागले होते. सध्या तो रिहॅबिलिटेशन प्रक्रियेतून जात आहे. निवडकर्त्यांनी त्याला संघात कायम ठेवले असले तरी, त्याचे खेळणे फिटनेस टेस्टनंतरच निश्चित होईल.

स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या जवळपास दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर संघात परतला आहे. त्याने आशिया चषकानंतर क्रिकेट खेळलेला नाही. पण, अलीकडेच त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये दमदार पुनरागमन करत आपला फिटनेस सिद्ध केला आहे.

टी२० मालिकेसाठी १५ सदस्यीय भारतीय संघ :

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार, फिटनेसवर अवलंबून), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, संजू सॅमसन, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सुंदर.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button