जेजुरीकरांनी उधळला लोकशाहीचा भंडारा
78% केले मतदान, शांतता आणि खेळीमिळीत पार पडला लोक मतदान सोहळा.

पुरंदर : संपूर्ण राज्यभरातील काही नगरपालिका निवडणुका मंगळवारी पार पडल्या तर काही निवडणूका न्यायलीयन आदेशा नुसार पुढे मागे घेत एकदिवसा नंतर निकाल देण्याचे आदेश देण्यात आले दरम्यान शांतता आणि खेळी मेळीच्या वातावरणात निवडणूक पार पाडण्याची अद्यापही संस्कृती पाळत खंडोबा च्या जेजुरीतील नागरिकांनी आपल्या लोकशाहीच्या कर्तव्याचा भंडारा उधळत 78% मतदान केले.
खंडोबाची जेजुरी ही राज्यात लक्षवेधी तीर्थक्षेत्र म्हणून ओळखली जाते अठरापगड जाती धर्माचे वास्तव्य असलेली जेजुरी केवळ धार्मिक तीर्थक्षेत्र नसून एक सांस्कृतिक गाव म्हणून ओळखले जाते वर्षाअखेर आठ यात्रा भरत असतात यामुळे या नगरीत बाहेरून दररोज भविक पर्यटकांची ये जा असते स्थानिक राजकीय पार्शवभूमी पाहता विविध पक्षाच्या शाखा संगठना आणि कार्यरथ असतात विशेषतः केवळ निवडणूक काळात राजकीय वतावरणात कोणतेही वाद राग द्वेष न करता चातुर्य आणि कौशल्य दाखवत राजकारण केले जाते केवळ सभा प्रचार मधून आरोप प्रत्यरोप केले जातात यंदा तर विशेष म्हणजे बाहेरील राजकीय आणि आर्थिक गतीविधीला थारा न डेता जेजुरी विकासा करिता काही विरोधक गट एकजुटीने येऊन निवडणूक लढवत होते.
हेही वाचा – सरकारचा मोठा निर्णय! Sanchar Saathi ॲप प्री-इंस्टॉलेशन आदेश मागे, या कारणामुळे दूरसंचार विभागाचा ‘यू-टर्न’

जेजुरीची मूलभूत सुविधा आणि गरजा जरी दूर अवस्थेत असल्या तरी मात्र होणाऱ्या निवडणुकी च्या माध्यमातून जेजुरीची घडी बसू शकेल या अपेक्षा जेजुरीकर नागरिकांनी व्यक्त करीत निवडणुका लढविल्या आहेत तर चक्क मंगळवारी निवडणूक दिवशी अखेरच्या टप्प्यातील मतदान झाल्यावर दोन्ही विरोधक नगरसेवक उमेदवारांनी कार्यकर्त्यांचा ऑन दी स्पॉट वाढदिवस साजराही केला वर्ण जाती भेद टोकाचे राजकारण याला थारा न देता बहुजन जेजुरीकर हा लोकशाही चा उत्सव जेजुरीच्या जत्रा यात्रा उरूस प्रमाणे साजरा करतात.

याचे कौतुक बाहेरून आलेले पोलीस तसेच निवडणूक अधिकारी पर्यटक भविक वर्गही करतात यंदा आणखी एक वैशिष्ट दिसून आले ते म्हणजे पिंक आदर्श निवडणूक केंद्र जेजुरी च्या मध्यभागातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी च्या प्रांगणातील छत्री मंदिर लगत असलेल्या जिजामाता स्कुल येथील मतदान केंद्रात सर्व महिला कर्मचारी वर्गाची नियुक्ती केली होती. गुलाबी रंगाचे गेट ही उभारले होते तर नगरपालिका लगत असलेल्या आरोग्यवर्धिनीची नुकतीच पूर्ण झालेली इमारत ही सजविण्यात आली होती फुग्यांची सजावट करीत आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आले होते .यामुळे या मतदान सोहळ्यात अगदीविविध पक्ष्याचे संघटनेचे कार्यकते विरोधी सत्ताधारी उमेदवार आणि ग्रामस्थ एकत्र येऊन लोकशाहीच्या या उत्सवाचा भंडारा उधळत होते.




