आम्ही फक्त खेळण्यासाठी इथे आलो..; सूर्यकुमारचं पाकिस्तानशी हस्तांदोलन न करण्याबाबत मोठं वक्तव्य

IND vs PAK | आशिया चषकात भारताने पाकिस्तानविरूद्ध सामन्यात ७ विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला. मात्र, सामन्यापेक्षा सामन्यादरम्यान आणि नंतर भारतीय संघाच्या वागण्याने सर्वांचे लक्ष वेधले. भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी टीमशी हस्तांदोलन केले नाही, टॉसदरम्यानही संवाद साधला नाही आणि सामन्यानंतरही हात मिळवण्यास नकार दिला. याबाबत कर्णधार सूर्यकुमार यादवने वक्तव्य केलं आहे.
सूर्यकुमार यादव हस्तांदोलन न करण्याबाबत म्हणाला, आम्ही बीसीसीआय आणि सरकारशी पूर्णपणे सहमत आहोत. आम्ही फक्त खेळण्यासाठी इथे आलो आहोत, असा निर्णय आम्ही घेतला होता आणि आम्ही त्यांना आमच्या खेळातून चोख प्रत्युत्तर दिलं. काही गोष्टी या खेळभावनेच्या पलीकडे असतात. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आप्तस्वकीय गमावलेल्या कुटुंबीयांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. मी म्हटल्याप्रमाणे हा विजय आम्ही ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी झालेल्या भारतीय लष्कराला समर्पित करत आहोत.
हेही वाचा : आसमंती भिनला, दाही दिशा घुमला… ‘शंभुराजे शंभुराजे’ जयघोष!
सामन्याचा थोडक्यात आढावा
पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १२७ धावा केल्या. भारताच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली, ज्यात कूलदीप यादवने ३ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात भारताने १५.५ षटकांत १२८ धावांचे आव्हान ७ विकेट्सने गाठले. कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी ३७ चेंडूत ४७ धावांची कमाल खेळी करत नाबाद राहिले, तर शिवम दुबे यांनी त्यांना चांगले साथ दिली. या विजयाने भारताने ग्रुप ए मधील आपली दुसरी विजय मिळवली आणि सुपर फोर्समध्ये प्रवेश निश्चित केला.





