‘माझ्या बुद्धीची किंमत महिन्याला २०० कोटी, पैशांसाठी खालच्या स्तरावर जाणार नाही’; नितीन गडकरी

Nitin Gadkari | इथेनॉल ब्लेंड फ्यूलची (ई- २० पेट्रोल) सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. सरकारने आता सर्वच पेट्रोल पंपांवर इथेनॉलचा समावेश असणारे पेट्रोल विकणे अनिवार्य केले आहे. सरकारच्या या निर्णयावर बरेच लोक शंका घेत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरही टीका केली जात आहे. दरम्यान, आता यावर नितीन गडकरी यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली आहे. ‘माझ्या बुद्धीची प्रत्येक महिन्याला २०० कोटी रुपये आहे. पैशांसाठी मी एवढ्या खालच्या स्तरावर जाऊ शकत नाही,’ असे ते म्हणाले.
नितीन गडकरी म्हणाले, मी हे सगळं पैशांसाठी करतोय असं तुम्हाला वाटतंय का? इमानदारीने पैसे कसे कमवायचे हे मला माहिती आहे. विदर्भात साधारण १० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्ये केल्या आहेत. ही बाब फारच लाजीरवानी आहे. या देशातला शेतकरी जोपर्यंत समृद्ध होत नाही, तोपर्यंत आमचे प्रयत्न चालूच राहतील.
हेही वाचा : आम्ही फक्त खेळण्यासाठी इथे आलो..; सूर्यकुमारचं पाकिस्तानशी हस्तांदोलन न करण्याबाबत मोठं वक्तव्य
नितीन गडकरी यांनी स्वतः वापरात असलेल्या इनोव्हा वाहनांची माहिती देत सांगितले की हे वाहन इथेनॉलवर चालते. या वाहनात पेट्रोलच्या तुलनेत निम्माच प्रति किलोमीटर इंधन खर्च आहे. त्यामुळे हे इंधन एकीकडे प्रदूषण कमी करत असताना दुसरीकडे खर्चही कमी करते. सोबत हे इंधन शेतकऱ्यांच्या शेतपिकाला जास्त दर मिळवून देत असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.
मी दलाली करत नाही, मी फसवणूक करत नाही. मला प्रामाणिकपणे कसे कमवायचे हे माहित आहे. मी माझ्या मुलांना कमाईच्या कल्पना देतो. माझ्या मुलाने इराणहून ८०० कंटेनर सफरचंद आणले आणि तिथे १००० कंटेनर केळी पाठवली, असेही नितीन गडकरी म्हणाले.





