सुनील गावस्करांनी नवीन उल हकला चांगलच सुनावले; म्हणाले, कान उघडून ऐक..

IPL 2023 : लखनऊ सुपर जायंट्स संघाचा खेळाडू नवीन उल हक सध्या चांगलाच चर्चेत आहे. आरसीबी विरूद्धच्या सामन्यात कोहलीशी त्याचा वाद झाला. तर कालच्या समान्यात रोहित शर्मासह मुंबई इंडियन्सशी सुद्धा त्याने पंगा घेतला. त्याने रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि कॅमरॉन ग्रीनची विकेट घेतल्यानंतर प्रत्येकवेळी खोड काढून मैदानातच इशारा दिला. आता यावरून लिटल मास्टर सुनील गावस्कर यांनी नवीनला चांगलच सुनावलं आहे.
सुनील गावस्कर म्हणाले की, मागील काही काळात नवीनचे प्रेक्षकांशी चांगले समीकरण जुळलेले नाही. पण आता तुम्हाला विकेट मिळाली आहे तर तुम्ही कान बंद करण्यापेक्षा कधी नव्हे ते मिळणाऱ्या टाळ्या ऐकायला हव्यात. जेव्हा एखादा खेळाडू शतक पूर्ण करतो तेव्हाही कान बंद करू नका, उलट कानाला हात लावून समोरच्यांना विचारा, हॉलो, आता मला तुमचा आवाज ऐकू येईल का? उत्साह आणि सेलिब्रेशन हे असं असायला हवे आणि हो हे मी माझ्या वयानुसार सांगतोय.
हेही वाचा – ‘काल राजकारणातील राखी सावंत-उर्फी जावेद एकत्र वडापाव खात होते’; नितेश राणेंची ठाकरेंवर बोचरी टीका
दरम्यान, आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि आरसीबी विरूद्धच्या समान्यात विराट कोहली आणि नवीन मध्ये वाद झाला होता. नंतर यावादात गंतम गंभीर देखील पडला होता. एवढंच नव्हे तर नवीनने आरसीबी प्लेऑफमधून बाहेर जाताच कोहलीला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता दोन्ही संघ आयपीएलमधून बाहेर झाले आहेत.





