Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

Vinod Kambli | विनोद कांबळीच्या मदतीला सुनील गावसकर, दरमहा ३० हजारांची आर्थिक मदत

Vinod Kambli | एकेकाळी क्रिकेटच्या मैदानावर आपल्या आक्रमक फलंदाजीने प्रेक्षकांची मने जिंकणारा भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी सध्या वैयक्तिक आणि आर्थिक संकटातून जात आहे. खराब आरोग्य आणि कौटुंबिक समस्यांशी झुंज देत असलेल्या कांबळीला आता माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी मदताचा हात पुढे केला आहे. गावसकर यांच्या चॅम्प्स फाउंडेशनच्या माध्यमातून कांबळीला दरमहा ३० हजार रुपये आणि वैद्यकीय खर्चासाठी वर्षाला ३० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.

गेल्या वर्षी युरीन इन्फेक्शन आणि त्वचेच्या समस्यांमुळे कांबळीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याची बिकट आर्थिक परिस्थिती समोर आली होती. यानंतर वानखेडे स्टेडियमवर झालेल्या भेटीत गावसकर यांनी कांबळीला मदत करण्याचे आश्वासन दिले होते. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, गावसकर यांनी आपल्या फाउंडेशनला कांबळीच्या वैद्यकीय आणि आर्थिक गरजांसाठी तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिले. १ एप्रिल २०२५ पासून कांबळीला आयुष्यभर मासिक आर्थिक मदत मिळेल.

हेही वाचा  :  जमीन आणि मालमत्तेवर बळजबरीने अतिक्रमण झालंय का? ‘या’ कायदेशीर मार्गाने मिळवा स्वत:चा हक्क 

गावसकर यांचे सहकारी अनिल जोशी यांनी सांगितले की, “कांबळीची तब्येत बिघडल्याचे कळताच गावसकर यांनी त्याला मदत करण्याचा निर्णय घेतला. आम्ही कांबळीच्या डॉक्टरांना भेटून त्याच्या प्रकृतीची संपूर्ण माहिती घेतली आणि चॅम्प्स फाउंडेशनमार्फत तातडीने मदत सुरू केली.”

यापूर्वी २०१३ मध्ये कांबळीवर सचिन तेंडुलकरच्या मदतीने दोन हृदय शस्त्रक्रिया झाल्या होत्या. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत कांबळीने भारतासाठी १०४ एकदिवसीय आणि १७ कसोटी सामने खेळले असून, त्याच्या खेळाने अनेक चाहत्यांची मने जिंकली होती. आता गावसकर यांच्या या मदतीमुळे कांबळीला त्याच्या कठीण काळात दिलासा मिळाला आहे.

चॅम्प्स फाउंडेशन १९९९ पासून गरजू माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूंना मदत करत आहे. कांबळीच्या बाबतीत फाउंडेशनने दाखवलेल्या तत्परतेमुळे त्याच्या चाहत्यांमध्येही सकारात्मक भावना निर्माण झाली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button