सोलापूरच्या वेताळ शेळके याने मानाची महाराष्ट्र केसरी गदा पटकावली
अंतिम सामन्यात पृथ्वीराज पाटीलवर मात

महाराष्ट्र : क्रीडा वर्तुळातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी अंतिम सामन्याचा निकाल लागला आहे. सोलापूरच्या वेताळ शेळके याने मानाची महाराष्ट्र केसरी गदा पटकावली आहे. वेताळ शेळके यासह 66 व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला आहे. वेताळने अंतिम सामन्यात मुंबईच्या पृथ्वीराज पाटील याचा पराभव करत महाराष्ट्र केसरी या गदेवर आपलं नाव कोरलं. वेताळ शेळकेच्या या विजयानंतर सोलापुरात जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत आहेत. तसेच वेताळचं सोशल मीडियावरुन अभिनंदन केलं जात आहे.
हेही वाचा – श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात गुढीपूजन व फुलांची भव्य आरास, भाविकांची बाप्पाचं दर्शन घेण्यास अलोट गर्दी
अहिल्यानगरमध्ये रंगला महाअंतिम सामना
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील महाअंतिम सामन्याचं आयोजन हे अहिल्यानगरमधील दादा पाटील महाविद्यालयाजवळील मैदानात करण्यात आलं होतं. महाअंतिम सामना पाहण्यासाठी असंख्य कुस्तीप्रेमींनी एकच गर्दी केली होती. तसेच अनेक क्षेत्रातील दिग्गजांनीही उपस्थितीती लावली होती. मानाच्या गदेसाठी पृथ्वीराज आणि वेताळ या दोघांमध्ये चुरस पाहायला मिळाली. मात्र अखेरीस वेताळ सरस ठरला. वेताळने पृथ्वीराजला अस्मान दाखवलं आणि मानाची गदा पटावण्यात यशस्वी ठरला. तर पृथ्वीराजला उपविजेता म्हणून समाधान मानावं लागलं.