‘रोहित शर्मा लठ्ठ आणि सर्वात वाईट कर्णधार’; काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांची टीका

Shama Mohamed | चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने रविवारी (२ मार्च) न्यूझीलंडचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक दिली. आता उपांत्य फेरीत भारत वि. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड वि. दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना पाहायला मिळणार आहे. भारताच्या या विजयानंतर क्रिकेट चाहत्यांकडून भारतीय संघाचे कौतुक होत आहे. यातच आता काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी एक्स पोस्टवरून भारतीय संघाचा कर्णधाररोहित शर्मावर शारीरिक टीका केली आहे.
काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मदयांनी म्हटले होते, रोहित शर्मा खेळाडू म्हणून खूप जाड असून त्याला वजन कमी करण्याची गरज आहे. तसेच तो भारताचा आतापर्यंतचा सर्वात वाईट कर्णधार आहे.
हेही वाचा : मास्टर माईंड ग्लोबल कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
रोहित शर्मा हा जागतिक दर्जाचा क्रिकेटपटू आहे, अशी एक्स पोस्ट अब्दुल गफार नामक युजरने केली होती. या पोस्टला उत्तर देताना शमा मोहम्मद यांनी प्रश्न विचारला, रोहित शर्मामध्ये जागतिक दर्जाचे असे काय आहे? त्याचे पूर्वसुरी सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, विराट कोहली, कपिल देव, रवि शास्त्री आणि इतरांकडे पाहा. त्यांच्या तुलनेत रोहित शर्मा एक साधारण कर्णधार आणि तितकाच सामान्य क्रिकेटपटू आहे. त्याला नशीबाने कर्णधार पदाची संधी मिळाली.