मास्टर माईंड ग्लोबल कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
शिक्षण विश्व : विविध सांस्कृतिक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी- चिंचवड | भोसरी येथील मास्टर माईंड स्कूलचा दोन दिवसीय वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाचे आयोजन संत तुकाराम बँक्वेटस हॉल भोसरी येथे करण्यात आले होते.
स्नेहसंमेलनाचे प्रमुख आकर्षण कौटंबिक नातेसंबंध, तसेच विविध ऐतिहासिक योद्धे ,शेतकरी यांना आदरांजली हे ठरले अशा विविध सादरीकरणातून सामाजिक संदेश देण्यात आले.कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी पी.के.इंटरनेशनल स्कूल चे चेअरमन सोमनाथ काटे, तसेच संचालक जगन्नाथ काटे, मास्टर माईंड शाळेचे विश्वस्त जयश्री गवळी, संकेत गवळी, मणीकंदन नायर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. प्रदीपा नायर आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा : ‘विरोधी पक्षनेते पदावर आमचा हक्क’; संजय राऊत यांचं विधान
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत आपल्या कलागुणांचा आविष्कार केला. नर्सरी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध नृत्यांना, गाण्यांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गुणवंत विद्यार्थी- शिक्षकांचा सन्मान..
महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना, शिक्षकांना तसेच कर्मचाऱ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले . शाळेच्या प्राचार्या डॉ. प्रदीपा नायर यांनी विद्यालयाच्या संपूर्ण अहवालाचे वाचन केले. या दोन दिवसीय कार्यक्रमास शाळेचे विद्यार्थी, शिक्षक तसेच पाच हजार हून अधिक पालक उपस्थित होते.अशाप्रकारे आनंदी व उत्साही वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला. वंदे मातरम् या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.