Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘मेरी हिम्मत परखने की गुस्ताखी मत करना’; देवेंद्र फडणवीसांचं ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबई | शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘एक तर तू राहशील किंवा मी तरी राहीन’, अशा शब्दांत निर्वाणीचा इशारा दिला आहे. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावर भाजपाकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मुंबई भाजपाने उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. त्याच्या प्रत्युत्तरात देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

भाजपने शेअर केलेल्या व्हिडओत देवेंद्र फडणवीस शेरोशायरी करताना दिसत आहेत. फडणवीस म्हणाले की, ‘मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी मत करना, पहले ही कई फसानो का रूख मोड चुका हूँ मैं!’

हेही वाचा     –    ‘दंत स्वास्थ्य: निरोगी जीवनाचा पाया’

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपाला घाम फोडला. आता विधानसभा निवडणुकीत उरलीसुरली गुर्मी उतरवणार आहोत. राजकारणात एक तर तू राहशील, नाही तर मी राहीन, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button