Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

IND vs BAN : पुण्यात रोहित शर्माने केला गोलंदाजीचा सराव, व्हिडीओ व्हायरल

पुणे : भारतीय कर्णधार रोहित शर्मा एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये आतापर्यंत जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. तीन डावात त्याने १ शतक आणि १ अर्धशतक झळकावले आहे. आता तो गोलंदाजीतही चमक दाखवण्यासाठी सज्ज दिसत आहे.

भारतीय संघ गुरूवार, १९ ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्ध विश्वचषकातील आपला पुढचा सामना खेळणार आहे. हा सामना पुण्याच्या एमसीए मैदानावर होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ पुण्यात दाखल झाले आहेत. भारतीय संघाने आज नेट्समध्ये घाम गाळला. रोहित शर्माने आधी फलंदाजी आणि नंतर गोलंदाजीचा कसून सराव केला. सराव सत्रात गोलंदाजी करतानाचा रोहितचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – पोटाच्या समस्येसाठी भोपळा फायदेशीर, वाचा खास रेसिपी.. 

रोहित शर्माने भारतीय संघासाठी तिन्ही फॉर्मेटमध्ये गोलंदाजी केली आहे. कसोटीच्या १६ डावात त्याने दोन विकेट घेतल्या आहेत. वनडेमध्ये ३८ डावात ८ विकेट घेतल्या आहेत. तर टी-२० मध्ये एक विकेट घेतली आहे. आयपीएलमध्ये सलग तीन विकेट घेण्याचा रेकॉर्ड्सही रोहित शर्माच्या नावावर आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button