‘मुलांनी ध्येय व उदिष्ट ठरवून त्या दिशेने वाटचाल करावी’; मेजर डॉ. विपुल पाटील
शिक्षण विश्व: गायत्री इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात

पिंपरी-चिंचवड : मुलांनी ध्येय व उदिष्ट ठरवून त्या दिशेने वाटचाल करावी. अडथळयांना घाबरु नये, असे मेजर डाॅ. विपुल पाटील यांनी सांगितले.
गायत्री इंग्लिश मिडीयम स्कुल अँड जुनिअर कॉलेज,मोशी शाळेचा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व आनंदमयी वातावरणात सादर झाला. या कार्यक्रमास मेजर डाॅ. विपुल पाटील यांची प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थिती लाभली.
योगेश इंटरप्रायजेस चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री .योगेश भोंगाळे यांनी उपस्थिती दाखवली. त्यांनी या प्रसंगी उपस्थित असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचे स्वागत केले व शाळा संपल्यावरही असेच स्नेह जपावे अशी विनंती करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा : ‘देवेंद्र फडणवीस ईव्हीएम सीएम’; प्रणिती शिंदे यांची टीका

या प्रसंगी मुलांनी रोमांचक भाषणे केली तसेच देशभक्तीपर गीते प्रस्तुत केली. सूर्यनमस्कारचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले तसेच नृत्य सादर केले. MCF मध्ये प्रथम क्रमांक पटकवलेल्या मुलींचा चषक देऊन सन्मान करण्यात आला तर चित्रकला ग्रेड परीक्षाचे प्रशिस्तीपत्रक देण्यात आले.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, पदाधिकारी, माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘हुनर – 2025’ प्रदर्शन…
मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी ‘हुनर – 2025’ प्रदर्शन भरवण्यात आले. यामध्ये मुलांनी चित्र व विविध हस्तकलांचे सादरीकरण केले जे मुख्य आकर्षण ठरले. या प्रसंगी संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष विनायक भोंगाळे यांनी सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कविता कडू यांनी या प्रसंगी आपला अभ्यास करून कर्तव्य व्यवस्थित पार पाडून देशभक्तीचे प्रदर्शन घडवावे असे सुचवले.





