हिटमॅनने खरंच वचन पाळलं! फॅनला भेट दिली 4 कोटींची लॅम्बोर्गिनी कार; व्हिडीओ व्हायरल

Rohit Sharma Lamborghini | इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) चा यंदाचा हंगाम अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. संघातील बदल, चुरशीचे सामने आणि खेळाडूंच्या कामगिरीने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. मात्र, यंदाच्या हंगामात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू रोहित शर्माच्या एका खास जाहिरातीने. आयपीएल २०२५ च्या सुरुवातीला रोहितने Dream11 च्या जाहिरातीत आपली आलिशान लॅम्बोर्गिनी उरुस कार फॅन्टसी क्रिकेट स्पर्धेच्या विजेत्याला भेट देण्याचं वचन दिलं होतं. आता रोहितने आपलं हे वचन पूर्ण केलं असून, त्याने आपली ४ कोटींची लॅम्बोर्गिनी कार एका भाग्यवान विजेत्याला भेट म्हणून दिली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हेही वाचा : पालखी मार्गावरील अडथळे दूर करा; पुणे महापालिका आयुक्तांचे प्रशासनाला आदेश
१९ मे रोजी रोहितने ही महागडी कार फॅन्टसी क्रिकेट स्पर्धेच्या विजेत्याला सुपूर्द केली. या जाहिरातीत रोहितने मजेशीर अंदाजात कार भेट देण्याचं जाहीर केलं होतं, ज्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. जाहिरातीच्या दुसऱ्या भागात रोहितला कार भेट देताना आणि नंतर ऑटोरिक्षाने घरी परतताना दाखवण्यात आलं होतं, ज्याने चाहत्यांना खूप हसवलं. प्रत्यक्षातही रोहितने आपला शब्द पाळला आणि विजेत्याला ही आलिशान कार भेट दिली. या क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने पसरला असून, चाहते रोहितच्या या मोठ्या मनाचं कौतुक करत आहेत.