क्रिडाताज्या घडामोडी

रिषभ पंतचे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतासाठी सलग दुसरे शतक

'हा' पराक्रम करणारा जगातील दुसराच विकेटकीपर

मुंबई : इंग्लंड विरुद्ध भारत संघात हेडिंग्लेमध्ये कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू असून रिषभ पंतने हा सामना त्याच्या अतरंगी फलंदाजीने गाजवला आहे. त्याने या सामन्यात अनेक विक्रम करताना नवे विक्रम रचलेही आहेत.

आजपर्यंत कोणत्याच भारतीय यष्टीरक्षकाला न जमलेला कारनामाही त्याने करून दाखवला आहे. या सामन्यात भारताच्या दुसऱ्या डावात केएल राहुलच्या पाठोपाठ रिषभ पंतनेही शतक ठोकले आहे. त्याचे हे या सामन्यातील दुसरे शतक आहे.

या सामन्यात भारताने दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन यांच्या विकेट्स तिसऱ्या दिवशीच गमावल्या होत्या. पण चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच कर्णधार शुभमन गिलही ८ धावांवर बाद झाला. पण त्यानंतर सलामीवीर केएल राहुलला साथ मिळाली ती रिषभ पंतची.

रिषभने एका बाजूने आक्रमक फटके खेळणे सुरू ठेवले होते, तर दुसऱ्या बाजूने केएल राहुल संयमी खेळ करत होता. त्यातही दुसऱ्या सत्रात दोघांनीही धावांची गती वाढवली. यादरम्यान दोघांमध्ये दीडशतकी भागीदारीही झाली. केएल राहुलने २०२ चेंडूत आधी त्याचे ९ वे कसोटी शतक पूर्ण केले.

हेही वाचा –  माटे हायस्कूलमध्ये योग दिन उत्साहात साजरा

त्यापाठोपाठ काही वेळातच रिषभ पंतने देखील १३० चेंडूत त्याचे ८ वे कसोटी शतक, तर इंग्लंडमधील चौथे शतक पूर्ण केले. तो ८ शतके करणारा भारताचा पहिलाच यष्टीरक्षक फलंदाज आहे. त्याच्यापाठोपाठ ६ शतकांसह एमएस धोनी आहे.

याशिवाय रिषभने पहिल्या डावातही १३४ धावांची खेळी केली होती. रिषभने पहिल्या डावातील शतकानंतर कोलांटीउडी मारली होती. पण दुसऱ्या शतकानंतर त्याने डोळ्यावर हात ठेवत सेलीब्रेशन केले.

जगातील दुसराच यष्टीरक्षक
रिषभ पंत एकाच कसोटी सामन्यात दोन्ही डावात शतक करणारा भारताचा पहिला, तर जगातील दुसराच यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. याआधी असा कारनामा केवळ झिम्बाब्वेच्या अँडी फ्लॉवर यांनी केला होता. त्यांनी २००१ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हरारेमध्ये १४२ आणि नाबाद १९९ धावांची खेळी केली होती.

इतकेच नाही, तर इंग्लंडमध्ये कसोटीत दोन्ही डावात शतक करणारा रिषभ भारताचा पहिलाच फलंदाजही आहे. आजपर्यंत कोणालाही असा पराक्रम करता आला नव्हता.

डेविलियर्सला टाकले मागे
दरम्यान, कसोटीमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या यष्टीरक्षकांच्या यादीत आता तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने इंग्लंडच्या लेग एम्स यांची बरोबरी केली आहे. त्यांनी १९२९ ते १९३९ दरम्यान इंग्लंडसाठी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून ८ शतके केली होती.

या यादीत पहिल्या क्रमांकावर १७ शतकांसह ऑस्ट्रेलियाचा ऍडम गिलख्रिस्ट आहे. दुसऱ्या क्रमांकावर १२ शतकांसह अँडी फ्लॉवर आहेत. तसेच पंत आणि लेग एम्स पाठोपाठ चौथ्या क्रमांकावर संयुक्तरित्या एबी डिविलियर्स, एमजे प्रायर, कुमार संगकारा आणि बीजे वॉटलिंग आहेत, ज्यांच्या नावावर प्रत्येकी ७ शतके आहेत.

धोनीलाही पछाडलं
रिषभ पंतने आणखी एक मोठा विक्रम केला आहे. तो आता इंग्लंडमध्ये कसोटीत सर्वाधिक धावा करणारा परदेशी यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. त्याने धोनीच्या ७७८ धावांच्या विक्रमाला मागे टाकले आहे. रिषभच्या इंग्लंडमध्ये ८०० धावा पूर्ण झाल्या आहेत. तो ८०० कसोटी धावा इंग्लंडमध्ये करणारा पहिलाच परदेशी यष्टीरक्षक फलंदाज आहे.

बाशीरने केलं बाद
शतकानंतरही रिषभ आक्रमक खेळत होता. पण अखेर त्याला ११८ धावांवर शोएब बाशीरने ७२ व्या षटकात बाद केले. रिषभने १५ चौकार आणि ३ षटकारांसह १४० चेंडूत ही शतकी खेळी केली. त्याने केएल राहुल सोबत १९५ धावांची भागीदारीही केली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button