Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

RCB संघ तब्बल १६ हजार कोटींना सोल्ड! IPL इतिहासातील सर्वात मोठी डील

RCB | आयपीएलमधील लोकप्रिय फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ (आरसीबी) संघाची तब्बल १६ हजार ६०० कोटी रुपयांना विक्री झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएल २०२५ मध्ये ऐतिहासिक जेतेपद पटकावल्यानंतर आरसीबी संघ खरेदीसाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली होती. अखेरीस उद्योगपती आदित्य बिर्ला यांच्या नेतृत्वाखालील समूहाने ही ऐतिहासिक डील पूर्ण केल्याचे वृत्त आहे.

माहितीनुसार, आदित्य बिर्ला समूह, द टाइम्स ग्रुप, बोल्ट व्हेंचर्स आणि ब्लॅकस्टोन या चार समूहांच्या कन्सोर्टियमने एकत्रितपणे सुमारे १.७८ अब्ज डॉलर्स (अंदाजे १६,६०० कोटी रुपये) देऊन आरसीबीमधील १०० टक्के हिस्सा खरेदी करण्याचा करार केला आहे. ही डील आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या व्यवहारांपैकी एक मानली जात आहे.

हेही वाचा      :            ट्रम्प यांचा १५ कलमी ‘शांती प्रस्ताव’; इराणच्या ७ अटींमुळे चर्चांना नवे वळण

या व्यवहारानंतर आरसीबीच्या अध्यक्षपदी आर्यमन विक्रम बिर्ला यांची नियुक्ती होणार असल्याचे सांगितले जात आहे. ते स्वतः व्यावसायिक क्रिकेटपटू असून उद्योग क्षेत्रातही सक्रिय आहेत. तसेच, सत्यन गजवानी हे फ्रँचायझीचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहतील.
दरम्यान, आरसीबीच्या विक्रीसाठी डियाजिओ ची उपकंपनी युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड यांच्यासोबत करार करण्यात आला आहे. या करारामध्ये आयपीएल संघासोबतच महिला प्रीमियर लीग (WPL) मधील आरसीबी संघाचाही समावेश आहे.

तथापि, या व्यवहाराला अंतिम स्वरूप देण्यासाठी बीसीसीआय तसेच इतर नियामक संस्थांची मंजुरी आवश्यक आहे. त्यामुळे आयपीएल २०२६ हंगामात आरसीबीचे संचालन सध्याच्या व्यवस्थापनाकडूनच केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button