नवजीवन स्पोर्ट्सच्या युवा खेळाडूंनी राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत गाजवली बाजी
आरल सोनावणे व अंशुमन धावडे यांना पदकांसह सुवर्णपदक; पालक व प्रशिक्षकांचे अभिनंदन

पिंपरी-चिंचवड | उज्जैन, मध्यप्रदेश येथे झालेल्या ६९ व्या शालेय राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत नवजीवन स्पोर्ट्स, दिघीचे युवा खेळाडू अत्यंत यशस्वी ठरले. भारतातील विविध राज्यांतील संघांनी यात सहभाग घेतला. दिनांक २४ ते २८ नोव्हेंबर २०२५ दरम्यान ही स्पर्धा झाली.
१४ वर्षाखालील मुली वयोगटात कु. आरल आनंता सोनावणे यांनी पदक मिळवले. १७ वर्षाखालील मुले वयोगटात अंशुमन निलेश धावडे यांनी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत सांघिक विजेतेपद (सुवर्णपदक) पटकावले.
हेही वाचा : पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे ‘कुष्ठरोग शोध मोहीम’!
नवजीवन स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष व भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस उदय गायकवाड यांच्या वतीने दोन्ही खेळाडूंना, तसेच त्यांच्या पालक व प्रशिक्षकांना हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे. संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या यशाने खेळाडूंना पुढील काळातही प्रेरणा मिळेल आणि नवजीवन स्पोर्ट्सचा गौरव वाढेल.
आरल आणि अंशुमनसारख्या युवा खेळाडूंच्या कामगिरीने महाराष्ट्राचे नाव उज्वल केले आहे. नवजीवन स्पोर्ट्स फाउंडेशनचे मार्गदर्शन आणि कष्ट यशस्वी ठरले आहेत. भविष्यातही या प्रतिभावंत खेळाडूंनी मेहनत करत महाराष्ट्राचे आणि देशाचे नाव वाढवेल, अशी मला पूर्ण आशा आहे.
– उदय गायकवाड, सरचिटणीस, भाजपा युवा मोर्चा.





