Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

पाकिस्तानी तरूणीकडून विराट कोहलीचं कौतुक, व्हिडीओ व्हायरल..

Virat Kohli : भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्यासाठी अनेक चाहत्यांनी गर्दी केली होती. या सामन्यावेळीचा एका पाकिस्तानी तरुणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक पाकिस्तानी तरुणी भारतीय फलंदाज विराट कोहलीचं कौतुक करत असल्याचे दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओत तरूणी म्हणाली, विराट कोहली हा माझा आवडता खेळाडू आहे. मी खास त्याच्यासाठी इथे मॅच बघायला आले होते. तो शतक करेल, असं मला अपेक्षित होतं. पण माझा अपेक्षाभंग झाला. मी पाकिस्तान आणि विराट कोहली दोघांनाही पाठिंबा देत आहे.

हेही वाचा – धक्कादायक! मुंबई लोकलमध्ये ‘ड्रग्ज’ची नशा करतानाचा व्हिडीओ व्हायरल

यावेळीच एका पाकिस्तानी व्यक्तीने तिला विराट कोहलीला सपोर्ट का करतीय? असा सवाल केला. यावर ती तरूणी म्हणाली, चाचा, शेजाऱ्यांवर प्रेम करणं चुकीचं तर नाही ना..असं म्हणाली. या पाकिस्तानी तरूणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button