breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

धक्कादायक! मुंबई लोकलमध्ये ‘ड्रग्ज’ची नशा करतानाचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई : मुंबई लोकलमध्ये बसण्यावरुन दोन प्रवाशांचा वाद झाल्याचा एक व्हिडीओ काही दिवसांपुर्वी व्हायरल झाला होता. दरम्यान, मुंबई लोकलमधील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे पोलिस आणि इतर रेल्वेची यंत्रणा सुध्दा खडबडून जागी झाली आहे.

सहा तरुण लोकलमधून प्रवास करीत असताना ‘ड्रग्ज’ची नशा करीत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यापासून लोकांना मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी त्यांच्यावर कडक कारवाई करावी असा नाराजीचा सूर व्यक्त केला आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी लोकलमध्ये घडली असल्याचं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा – ‘सनातन धर्म डेंग्यू, मलेरियासारखा त्याला..’; उदयनिधी स्टॅलिन यांचं वादग्रस्त विधान

व्हायरल व्हिडीओमध्ये काही तरुण गर्दीत नशा करीत आहेत. एक तरुण मोबाईलवरुन ड्रग्जची मागणी करीत आहे. सहा तरुण लोकांच्या गर्दीत ड्रग्जची नशा करीत आहेत. हा व्हिडीओ जेव्हापासून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तेव्हापासून रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. या प्रकरणातील आरोपींना शोधण्याचं काम पोलिसांनी सुरु केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button