न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वीच टीम इंडियात एक बदल
हर्षितला विश्रांती देण्यात आली आहे, वरुण आमच्यासाठी खेळत आहे.

पुणे : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या औपचारिक सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे संघ आमनेसामने आले आहेत. दोन्ही संघांनी उपांत्य फेरी गाठली आहे. त्यामुळे जयपराजयाचा फरक पडणार नाही. पण कोणता संघ उपांत्य फेरीला समोर हे मात्र नक्की होणार आहे. भारताने हा सामना जिंकला तर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया, जर गमावला तर दक्षिण अफ्रिकेशी लढत करावी लागणार आहे. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. दरम्यान, या सामन्याआधीच टीम इंडियात बदल करण्यात आला आहे. कारण कर्णधार रोहित शर्माने प्लेइंग 11 मध्ये बदल केला आहे. आतापर्यंत खेळलेल्या दोन सामन्यात रोहित शर्माने त्याच प्लेइंग 11 वर विश्वास टाकला होता. मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियात एक बदल केला आहे.
कर्णधार रोहित शर्माने सांगितलं की, आम्हाला प्रथम फलंदाजी करायची होती, आम्ही दोन्ही सामन्यांमध्ये पाठलाग केल्यामुळे आम्ही सुरुवातीला काय करू शकतो आणि नंतर आमच्या गोलंदाजांना आव्हान देऊ शकतो हे पहायचे होते. मागील सामन्यांसारखेच दृष्टिकोन असेल, फक्त त्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्या संघात एक बदल आहे. हर्षितला विश्रांती देण्यात आली आहे, वरुण आमच्यासाठी खेळत आहे. हे सर्व भागीदारीत गोलंदाजी करण्याबद्दल आहे. दोन्ही सामन्यांमध्ये आम्ही एकत्रितपणे 19 बळी घेतले आहेत. आमच्या फिरकी गोलंदाजांनी त्यांना रोखले आहे आणि नंतर वेगवान गोलंदाजांनी बळी मिळवले आहेत.
न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर याने सांगितलं की, ‘आम्हाला सुरुवातीला गोलंदाजी करायला आवडेल, चांगली खेळपट्टी दिसतेय. सुरुवातीला थोडा दबाव आणायचा आहे आणि आशा आहे की नंतर खेळपट्टी चांगली होईल. आम्हाला अजूनही जिंकायचे आहे, आम्हाला माहित आहे की आम्ही नंतर लाहोरमध्ये असणार आहोत.’
दोन्ही संघांची प्लेइंग 11
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.
न्यूझीलंड (प्लेइंग 11): विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, काइल जेमिसन, विल्यम ओरोर्क.