Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘झेडएफ इंडिया’च्या कामगारांना 20 हजारांची पगारवाढ!

आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीमध्ये वेतनवाढ करार

 चाकण औद्योगिक पट्टयातून मिळाली सर्वाधिक वेतनवाढ

पिंपरी- चिंचवड : चाकण औद्योगिक वसाहातीमधील वासुली येथील झेडएफ इंडिया प्रा. लि. व स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यामध्ये परिसरातील सर्वाधिक वेतनवाढ करार करण्यात आला. या करारानुसार कंपनीच्या कर्मचाऱ्यांना 20 हजार 100 रुपयांची भरघोस पगारवाढ मिळाली आहे.

भारतीय जनता पार्टीचे नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा वेतनवाढ करार करण्यात आला. यावैळी स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटनेचे सल्लागार रोहिदास गाडे, अध्यक्ष जीवन येळवंडे उपस्थित होते.

या प्रसंगी संघटनेचे सरचिटणीस कृष्णा रोहोकले, खजिनदार अमृत चौधरी, महादेव येळवंडे, प्रशांत पाडेकर, रविंद्र भालेराव, दत्तात्रय गवारे, यूनिट अध्यक्ष तुषार पवळे, उपाध्यक्ष विक्रम सुक्रे, सरचिटणीस राहुल भोसले, सहचिटणीस अंगद चौधर, खजिनदार आतिब शेख, संघटक प्रतिक कदम, व्यवस्थापनाच्या वतीने कंपनीचे प्लांट हेड. शामबाबू आकुला, एचआर मॅनेजर रवी हंगारगे यांनी करारवर स्वाक्षरी केली.

हेही वाचा –  पारा चाळीशीच्या उंबरठ्यावर

प्रास्ताविक एच. आर हेड रवी हंगारगे यांनी केले, तसेच सूत्रसंचालन पुजा थिगळे यांनी केले. सरचिटणीस कृष्णा रोहोकले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला. कामगारानी पेढे वाटून फटाक्याची अतिषबाजी करुण आनंद व्यक्त केला

करारामध्ये झालेले ठळक मुद्दे…

एकूण पगारवाढ :- २०१००/- (वीस हजार शंभर रुपये ), पगाराचा रेशो:- पहिल्या वर्षी ८०% दुसऱ्या वर्षी १०% तिसऱ्या वर्षी १०% मिळणार., कराराचा कालावधी ०१/०४/२०२४ ते ३१/०३/२०२७ या तीन वर्षांचा राहील., मेडिक्लेम पॉलीसी २०००००/- रुपये संपूर्ण खर्च कंपनी करणार, व जादाची १००००००/- रुपयांची बफर पॉलीसी, या पॉलिसी मध्ये स्वतः, पत्नी, मुले आणि आई वडील यांचा समावेश करण्यात आला आहे, मृत्यू साहाय्य योजना, ग्रुप एक्सीडेंट पॉलिसी:- ४० लाख रुपये रक्कम कंपनीकडून वारसदारास देण्यात येईल., दिवाळी बोनस:- कायदेशीर बोनसच्या व्यतिरिक्त अधिकचा CTC च्या बाहेर ८५०१/- रुपये रक्कम बोनस म्हणून देण्यात येईल, व २०००/- रुपये रकमेची एक भेट वस्तू देण्यात येईल. मासिक हजेरी बक्षीस, गुणवंत कामगार पुरस्कार:- प्रत्येक वर्षी दोन गुणवंत कामगारांची निवड करून त्यांना ८५०१/- रुपये एवढी रक्कम बक्षिस म्हणून देण्याचे मान्य, प्रत्येक कामगाराला प्रत्येकी ११ महिन्याचा फरक देण्यात येणार आहे, असे वेतनवाढ करारामध्ये निश्चित करण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button