भारतीय संघाला मोठा झटका! ‘हा’ हुकमी एक्का चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर

Champions Trophy 2025 | भारतीय क्रिकेट संघाला ICC चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मोठा झटका बसला आहे. कारण टीम इंडियाचा हुकमी एक्का स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर असणार आहे. कारण बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळू शकणार नाही. मात्र आता त्याची जागा युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणा घेणार आहे.
येत्या १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होणार असून भारताची पहिली लढत २० तारखेला बांगलादेशविरुद्ध होणार आहे. ICC चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कर्णधार रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करणार आहे तर शुभमन गिल उपकर्णधार असणार आहे.
हेही वाचा : ‘दिल्लीत साहित्य संमेलन सुरू नसून राजकीय दलाली सुरू’; संजय राऊतांची टीका
भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.