Breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL 2020 : मुंबईची प्ले-ऑफमध्ये धडक; बंगळुरुवर 5 विकेट्सनी मात

अबुधाबी – सूर्यकुमार यादवच्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने प्ले ऑफमध्ये दमदार धडक मारली आहे. कालच्या सामन्यात मुंबईने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर 5 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. बंगळुरुने मुंबईला विजयासाठी 165 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान मुंबईने 5 विकेट्स गमावून 5 चेंडूआधी पूर्ण केले. मुंबईने 19.1 षटकांत 166-5 धावा केल्या. सूर्यकुमार यादव मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने सर्वाधिक नाबाद 79 धावांची शानदार खेळी केली.

सामन्याच्या सुरुवातीला मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची प्रथम फलंदाजी करताना सुरुवात दमदार झाली. जोश फिलिप आणि देवदत्त पड्डिकलने पहिल्या विकेटसाठी 7.5 षटकांत 71 धावांची भागीदारी केली. मग फिलिप 24 चेंडूत 33 धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली 14 चेंडूत केवळ 9 धावा करून बाद झाला. बुमराहने त्याला माघारी धाडले. कोहलीनंतर एबी डिव्हिलियर्ससुद्धा 15 धावांवर बाद झाला. डिव्हिलियर्सनंतर देवदत्त पड्डिकलही 74 धावांवर बाद झाला. पड्डिकलने यंदाच्या हंगामातील आपले चौथे अर्धशतक झळकावले. पड्डिकलनंतर शिवम दुबे आणि ख्रिस मॉरिसही स्वस्तात माघारी परतले. डावाच्या शेवटी वॉशिंग्टन सुंदरने 6 चेंडूत नाबाद 10 धावा केल्या आणि गुरकीरतसिंग मानने 11 चेंडूंत नाबाद 14 धावा केल्या. तर मुंबईकडून जसप्रीत बुमराहने उत्तम गोलंदाजी करत चार षटकांत 14 धावा देत तीन विकेट घेतल्या. ट्रेंट बोल्ट, राहुल चहर आणि कायरन पोलार्डने प्रत्येकी एक विकेट घेतली.

तसेच बंगळुरूने दिलेल्या 165 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना क्विंटन डी कॉक 18 धावांवर बाद झाला. ईशान किशनने डावाची सुरुवात चांगली केली पण मोठा फटका खेळताना तो 25 धावांवर बाद झाला. त्यानंतर सौरभ तिवारी आणि कृणाला पांड्याही स्वस्तात माघारी गेले. सौरव तिवारीने 5 तर कृणाल पांड्याने 10 धावा केल्या. एकीकडे एक एक फलंदाज बाद होत असताना सूर्यकुमार यादवने एक बाजू लावून धरत अर्धशतक ठोकले. सूर्यकुमार यादवने 43 चेंडूंत 10 चौकार आणि 3 षटकारांवर 79 धावा केल्या. हार्दिक पांड्याने 17 धावा करत त्याला उत्तम साथ दिली. तर बंगळुरूकडून मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहलने प्रत्येक दोन तर ख्रिस मॉरिसने एक विकेट घेतली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button