Breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL 2020 : आज कोलकाता विरुद्ध बंगळुरू लढत

अबूधाबी – आज आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अशी महत्त्वाची लढत रंगणार आहे. मागील लढतीत ए बी डिव्हिलियर्सच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कोलकाता नाईट रायडर्सचा धुव्वा उडवला होता. आज कोलकाताचा संघ या पराभवाचा वचपा काढणार का याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे.

मॉर्गनच्या नेतृत्त्वाखालील कोलकाताचा संघ १० गुणांसह चौथ्या स्थानी आहे. संघाच्या अद्याप पाच लढती शिल्लक आहेत. तर दुसऱ्या बाजूचा विचार करता बंगळुरूचा संघ कोलकाताच्या तुलनेत दोन गुणांनी आघाडीवर आहे. राजस्थान रॉयल्सचा ७ गडी राखून पराभव केल्यानंतर हा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे आज अबूधाबीत होणाऱ्या सामन्यात कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button