आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आयसीसीचे काही नियमात बदल
वनडे क्रिकेटमध्ये 35 षटकापर्यंत एकच चेंडू वापरणार

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमात काळानुरूप अनेक बदल होत गेले. आता आणखी आठ मुद्दे आयसीसीने निकाली काढले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात क्रिकेटचा उत्साह द्विगुणित होणार आहे. यात वनडे क्रिकेटमध्ये 35 षटकापर्यंत एकच चेंडू वापरला जाणार आहे. तसेच आयसीसीने कसोटीतही स्टॉप क्लॉक नियम लागू केला आहे. इतकंच काय तर एखादा खेळाडूचा झेल स्पष्ट दिसत नसेल आणि तरी तो बाद आहे यासाठी वाद घातला तर नो बॉल दिला जाईल. असे एकूण आठ नियम 2 जुलैपासून लागू होणार आहेत. चला जाणून घेऊयात काय ते…
टेस्ट क्रिकेटमध्ये स्टॉप क्लॉक : टी20 आणि वनडे क्रिकेटमध्ये स्टॉप क्लॉक नियम लागून आहे. आता कसोटीतही हा नियम लागू होणार आहे. कारण कसोटीत स्लो ओव्हर रेट ही मोठी समस्या आहे. नव्या नियमानुसार, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला षटक संपल्यानंतर दुसरं षटक एका मिनिटाच्या आत सुरु करावं लागेल. जर वेळेत केलं नाही तर दोन वॉर्निंग मिळतील. त्यानंतर प्रत्येक चुकीसाठी पाच धावांची पेनल्टी असेल. 80 षटकानंतर वॉर्निंग रिसेट होईल.
शॉर्ट रनसाठी आता दंड : शॉर्ट रनसाठीही यापूर्वी पाच धावांचं दंड होता. पण नव्या नियमात फलंदाज एक्ट्रा रन घेण्यासाठी जाणीवपूर्वक धाव पूर्ण करत नसेल तर अंपायर फिल्डिंग करणाऱ्या संघाला विचारेल की स्ट्राईकला कोण हवं? पण पंचांना फलंदाजाने असं जाणीवपूर्वक केलं असं वाटलं तरच हा नियम लागू होईल.
हेही वाचा – राज्यातील वीज ग्राहकांना सरसकट दिलासा
लाळ लावली तरी चेंडू बदलला जाणार नाही : चेंडूला लाल लावण्याच्या नियमात मोठा बदल झाला आहे. पंचांना चेंड़ूवर लाळ दिसली तर तो लगेच बदलला जाणार नाही. कारण चेंडू बदलण्यासाठी काही जण जाणीवपूर्वक लाळ लावतात. आता पंच चेंडू खूपच ओला किंवा त्याचा एक्स्ट्रा चमक असेलतर बदलतील. हा निर्णय पंचांच्या हातात असेल.
आऊट निर्णयानंतर डीआरएस प्रोटोकॉलमध्ये बदल : फलंदाजाला झेल बाद दिलं आणि त्याने रिव्ह्यू मागितला. अल्ट्राएजमध्ये चेंडू बॅटला न लागता पॅडला घासून घेल्याचं दिसलं तर पंच एलबीडब्ल्यू तपासत होते. पण झेल बाद नसेल तर एलबीडब्ल्यूही नाबाद असायचा. पण आता तसं असेल तर फलंदाज बाद असेल.
फलंदाजाविरुद्ध दोन अपील झाली तर… : टीव्ही पंच प्रथम पंचांच्या निर्णायाचा विचार करून नंतर खेळाडूंचा रिव्ह्यू विचारात घेत असत. पण आता फलंदाज पहिल्याच घटनेत बाद झाला तर चेंडू डेड होईल. दुसरा रिव्ह्यू अजिबात तपासला जाणार नाही. उदाहरणार्थ, जर एलबीडब्ल्यू आणि रन आउटसाठी अपील असेल तर टीव्ही पंच प्रथम एलबीडब्ल्यू तपासतील, कारण ते प्रथम घडले. जर फलंदाज बाद झाला तर चेंडू तिथेच डेड होईल.
झेलच्या नियमातही बदल : फिल्डवरील पंचांना झेल घेतला की नाही हे माहिती नसेल तेव्हा तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जायची. पण तेव्हा पहिल्यांदा नो बॉल तपासला जात होता. नो बॉल असल्याने पुढे काहीच तपासलं जात नव्हतं. पण आता तिसरा पंच फक्त झेल तपासणार. जर झेल बाद असेल तर संघाला नो बॉलसाठी एक्स्ट्रा रन मिळेल. पण झेल योग्य नसेल तर फलंदाजाने बनवलेल्या धावा संघाला मिळतील.
दोन नवे बदल : वनडे क्रिकेटमध्ये 35 षटकानंतर नवा चेंडू वापरण्याची संधी मिळेल. यामुळे वेगवान गोलंदाजांना डेथ ओव्हर्समध्ये मदत मिळू शकते. दुसरीकडे, सीमेवर झेल पकडताना क्षेत्ररक्षकाला सीमेबाहेर फक्त एकदाच उडी मारून झेल पकडण्याची संधी असेल.