breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

WTC फायनलपुर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! ‘हा’ खेळाडू झाला बाहेर

WTC Final 2023 : जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचा काउंटडाऊन सुरू झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ७ जूनपासून हा सामना खेळला जाणार आहे. अशातच आता ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलिया संघाचा स्टार गोलंदाज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमधून बाहेर पडला आहे. आयसीसीने याबाबत ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

आयसीसीने आपल्या ट्वीट मध्ये म्हटलं आहे की, ऑस्ट्रेलिया संघाचा गोलंदाज जॉश हेजलवूड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमधून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाने या आठवड्यातील भारताविरुद्ध ओव्हल येथे होणाऱ्या ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सामन्यासाठी त्यांच्या १५ खेळाडूंच्या संघात उशीरा बदल केला आहे. जोश हेझलवूड दुखापतीच्या समस्येमुळे सामन्यातून बाहेर पडला आहे.

हेही वाचा – ‘..यामुळे कोरोमंडल एक्सप्रेसचा भीषण अपघात झाला’; रेल्वे दुर्घटनेबाबत मोठा खुलासा

इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या शेवटच्या सामन्यातून तो दुखापतीमुळे बाहेर झाला होता. दरम्यान त्याने उजव्या हाताने कोणतीही जोखीम न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य राहणे, केएस भारत, रवींद्र जडेजा, इशान किशन, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी ऑस्ट्रेलिया संघ :

पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ट्रेव्हिस हेड, उस्मान खाजा, स्टीव्ह स्मिथ, कॅमरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स केरी, जोश इंग्लिस, स्कॉट बोलँड, नॅथन लियॉन, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button