breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रिय

‘..यामुळे कोरोमंडल एक्सप्रेसचा भीषण अपघात झाला’; रेल्वे दुर्घटनेबाबत मोठा खुलासा

Balasore Train Accident : ओडिशामध्ये झालेल्या कोरोमंडल एक्सप्रेसच्या भीषण अपघातात आत्तापर्यंत २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर या घटनेत शेकडो लोक जखमी झाली आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशातच आता अपघातामागील कारणाचा खुलासा झाला आहे. यानुसार, कोरोमंडल एक्सप्रेसचा बहानगा स्टेशनवर थांबा नसल्याने ही रेल्वे पूर्ण वेगाने धावत होती. त्यातूनच अपघात झाला, असं एएनआयने म्हटलं आहे.

कोरोमंडल एक्सप्रेसचा बहानगा बाजार रेल्वे स्टेशनवर थांबा नसल्याने कोरोमंडल भरधाव वेगाने प्रवास करत होती. याचवेळी कोरोमंडल एक्सप्रेसचा बहानगा बाजार रेल्वे स्टेशन येथे एका मालवाहू रेल्वेला धडक बसली आणि कोरोमंडलचे २१ डबे रूळावरून खाली उतरले. इतकंच नाही, तर तीन डबे जोरदार धडकेने उडून दुसऱ्या रेल्वे मार्गावर पडले.

हेही वाचा – साताऱ्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का! आमदार शशिकांत शिंदे यांच्या भावाचा शिवसेनेत प्रवेश

यावेळी यशवंतपूर-हावरा एक्सप्रेस बहानगा बाजार रेल्वे स्टेशन येथून जात होती. तेव्हा हावरा एक्सप्रेसची रेल्वे मार्गावर दोन डब्यांना धडक होऊन अपघात झाला.

कोरोमंडल एक्सप्रेसमध्ये आरक्षित जागांचे बुकिंग केलेले १२५७ प्रवासी होते. तर यशवंतपूर-हावरा एक्सप्रेसमध्ये १ हजार ३९ प्रवासी होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button