ताज्या घडामोडीपुणे

राज्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरू, पुण्यात मन सुन्न करणारी घटना

1600 मीटरचे तीन राऊंड पूर्ण अन् शेवटी तरूणाचा मृत्यू, काय घडलं?

मुंबई : राज्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरू असून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खाकीचं स्वप्न घेऊन पळत असलेल्या तरूणाचा चक्कर येऊन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. 400 मीटरचे तीन राऊंड झाल्यावर शेवटचा राऊंड पूर्ण करत असताना त्याच्या त्याच्या पायात क्रँम्प आला. त्यानंतर चक्कर येऊन तो खाली कोसळला. त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तुषार बबन भालके (वय 27) असं मृत्यू झालेल्या तरूणाचं नाव आहे.

आज सकाळी 8 वा या युवकाने रनिंगचे तीन राऊंड पूर्ण केले पण धावत असताना त्याच्या पायात क्रँम्प आला, मस्सल ब्रेक झाले आणि तो पडला. अधिकाऱ्यांनी तात्काळ त्याला अँम्ब्युलन्समधून ससूनला नेलं पण डिहायड्रेशन होऊन प्रथम त्याच्या किडनी फेल झाल्या आणि मग ह्रदय बंद पडलं. मल्टिपल ऑर्गन फेलुअर होऊन त्याचा उपचारादरम्यान दूर्दैवी अंत झाला.

पोलीस भर्ती दरम्यान युवकाचा दुर्दैवी अंत होण्याची राज्यातली ही तिसरी घटना आहे. यापूर्वी एसआरपीएफच्या भर्तीत मुंबईत दोन युवक दगावलेत त्यानंतर आज पुण्यात हा तिसरा प्रकार घडलाय. मयत युवकाचं नाव तुषार भालके असून तो मूळचा संगमनेर तालुक्यातील कोठे गावचा रहिवासी आहे.

राज्यात 19 जूनपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरु झाली. एकूण 17 हजार 471 जागांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज आले आहेत. बँड्समन पदाच्या 41 जागा, तुरुंग विभागात शिपाई पदाची जागा, चालक पदाच्या 1686 जागा, पोलीस शिपाई पदाच्या 9595 जागा तर शीघ्र कृती दलासाठी 4 हजार 349 जागांसाठी राज्यातील उमेदवार भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button