Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

भारत विरूद्ध पाकिस्तान समाना आज रंगणार, कधी, कुठे पाहाल Live?

Men’s T20 Emerging Teams Asia Cup 2024 | भारत गट ‘अ’ आणि पाकिस्तान गट ‘अ’ यांच्यातील आशिया चषकातील सामना आज १९ ऑक्टोबरला होणार असून हा सामना ओमान येथे होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना आज संध्याकाळी ७.०० वाजता रंगणार आहे. ही उद्योन्मुख खेळाडूसाठी स्पर्धा असून हा आशिया चषक युवा संघांमध्ये रंगणार आहे. त्यामुळे भारतासह सर्व देशांनी आपला युवा संघ या स्पर्धेसाठी पाठवला आहे.

भारतीय संघाचे कर्णधारपद यावेळी तिलक वर्माकडे देण्यात आले आहे. त्यामुळे तिलक वर्माच्या नेृत्वाखाली भारतीय संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे.

सामना कुठे पाहता येईल? 

भारत आणि पाकिस्तान हा सामना हॉटस्टार, जिओ सिनेमा किंवा सोनी लाइव्हवर पाहता येणार नाही. कारण हा सामना कोणत्याही टीव्ही चॅनेलवर होणार नसून सर्व चाहत्यांना फक्त आणि फक्त फॅन कोड या अॅपवरच पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा    –    ‘राज ठाकरेंचा भोंगा उतरवण्याचं काम वंचितचे कार्यकर्ते करतील’; सुजात आंबेडकरांची टीका 

भारतीय अ संघाचं वेळापत्रक

१९ ऑक्टोबर – भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ (वेळ – संध्या. ७ वा.)
२१ ऑक्टोबर – भारत अ विरुद्ध युएई (वेळ – संध्या. ७ वा.)
२३ ऑक्टोबर – भारत अ विरुद्ध ओमान (वेळ – संध्या. ७ वा.)

भारतीय अ संघ –

तिलक वर्मा (कर्णधार), अनुज रावत, आकिब खान, अभिषेक शर्मा, प्रभ सिमरन सिंग, वैभव अरोरा, आयुष बडोनी, नेहल वढेरा, रसिख सलाम, निशांत सिंधू, अंशुल कंभोज, साई किशोर, रमनदीप सिंग, हृतिक शोकीन,राहुल चाहर.

पाकिस्तान अ संघ –

मोहम्मद हारिस (कर्णधार), अब्दुल समद, अहमद दानियाल, अराफत मिन्हास, हैदर अली, हसिबुल्ला, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मेहरान मुमताज, मोहम्मद इम्रान जूनियर, ओमेर बिन युसूफ, कासिम अक्रम, शाहनवाज दहनी, जमान खान, यासिर खान आणि सुफियान मोकीम.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button