बीसीसीआय ही भारतामधील सर्वात धनाढ्या क्रीडा संघटना
पॅरिस ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या भारतीय खेळाडूंना बीसीसीआयची मोठी मदत
मुंबई : बीसीसीआयचा दानशूरपणा पुन्हा एकादा पाहायला मिळाला आहे. कारण पॅरिस ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या भारतीय खेळाडूंना करोडोंची मदत आता बीसीसीआयने केली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी याबाबतची माहिती दिली असून त्यांचे ट्विट आता
बीसीसीआय ही भारतामधील सर्वात धनाढ्या क्रीडा संघटना आहे. बीसीसीआय ही फक्त क्रिकेटची संघटना आहे. पण तरीही त्यांनी वेळोवेळी भारताच्या अन्य खेळांना आणि खेळाडूंनाही मदत केली आहे. आता पॅरिस ऑलिम्पिक काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यापूर्वी बीसीसीआयने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळणार भारतीय खेळाडूंसाठी मदत जाहीर केली आहे.
जय शाह हे आयसीसीच्या बैठकीसाठी श्रीलंकेला रवाना झाले होते. पण दुसरीकडे भारतीय खेळाडूंना कशी मदत केली जाईल, याचा विचारही त्यांनी केला आहे. त्यामुळे आता बीसीसीआयने ८.५० कोटी रुपये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी मदत म्हणून आयओएकडे सुपूर्द केले आहेत. जय शाह यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ” मला ही गोष्ट जाहीर करताना अभिमान वाटतो की, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जे भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत त्यांना बीसीसीआयने मदत करण्याचे ठरवले आहे. यासाठी बीसीसीआयने आयओए या संघटनेला ८.५० कोटी रुपये दिले आहेत. तुम्हा सर्वांना शुभेच्छा, भारताला अभिमान वाटेल. जय हिंद.”
भारतीय संघाने जेव्हा टी २० वर्ल्ड कप जिंकला होता तेव्हा त्यांना बीसीसीआयने तब्बल १२५ कोटी रुपये बक्षिस म्हणून जाहीर केले होते. भारतीय खेळाडूंची मुंबईत विजयी यात्रा काढण्यात आली होती. त्यावेळी बीसीसीआयने वानखेडे स्टेडियमवर एका खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या खास कार्यक्रमात बीसीसीआयने भारतीय संघाला हे १२५ कोटी रुपयांचे बक्षिस दिले होते.
बरं झालं त्याच्या हातात बॉल बसला, नाही तर मी त्याला बसवला असता!
पॅरिस ऑलिम्पिक हे २६ जुलैपासून सुरु होणार आहे. त्यानंतर भारतीय संघाच श्रीलंकेचा दौरा हा २७ जुलैपासून सुरु होणार आहे. त्यामुळे एकाच वेळी ऑलिम्पिक आणि क्रिकटचा आनंद आता चाहत्यांना येत्या काही दिवसांत लुटता येणार आहे.





