Breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी
फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : प्लिस्कोव्हा पराभूत;हॅलेपची आगेकूच

सध्या सुरु असलेल्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत गुरुवारी कॅरोलिना प्लिस्कोव्हाला पराभवाचा धक्का बसला. तर सिमोना हॅलेपने महिला एकेरीची तिसरी फेरी गाठली. गतविजेती अॅश्ले बार्टी, जपानची नाओमी ओसाका आणि अमेरिकेची सेरेना विल्यम्स यांसारख्या मातब्बर खेळाडूंनी विविध कारणांनी माघार घेतल्यामुळे रोमानियाच्या हॅलेपला जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. २०१८च्या विजेत्या हॅलेपनेसुद्धा जेतेपदाच्या दावेदाराला साजेशा खेळ करताना रोमानियाच्याच एरिना कॅमेलियाला ६-३, ६-४ अशी धूळ चारली.





