Breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

दिल्ली कॅपिटल्सची राजस्थान रॉयल्सवर १३ रन्सनी मात

दुबई – आयपीएल सिझन १३ च्या ३० व्या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सला १३ रन्सनी मात दिली. दिल्ली कॅपिटल्सची भेदक गोलंदाजी आणि अय्यर, धवनच्या बॅटींगच्या जोरावर दिल्लीने हा विजय मिळवला. यामुळे दिल्लीची टीम गुणतालिकेच पहिल्या स्थानावर पोहोचलीय.

दिल्लीकडून राजस्थान रॉयल्सना १६२ रन्सचे टार्गेट मिळाले होते. पण राजस्थानच्या टीमने २० ओव्हर्समध्ये ८ विकेट्सच्या बदल्यात १४८ रन्स केले आणि हार पत्करली. दिल्लीचा फास्ट बॉलर एनरिच नोरत्जे आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी २-२ विकेट घेतले. दिल्लीच्या शिखर धवनने ५७ आणि कॅप्टन श्रेयश अय्यरने धडाकेबाज ५३ रन्स केले.

मुंबई इंडीयन्स सोबत हरल्यानंर दिल्लीची टीम पुन्हा रुळावर आलेली दिसली. रॉयल्सच्या रॉबिन उथप्पा ने ३२ रन्स केले. दिल्लीचा फास्ट बॉलर एनरिचचा तो शिकार बनला.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button