Breaking-newsक्रिडा
जागतिक अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धा : भारताच्या पदरी दुहेरी निराशा!

- गोळाफेकपटू तेजिंदरपाल आणि धावपटू जॉन्सन अंतिम फेरी गाठण्यात अपयशी
दोहा : दोहा येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धेत गुरुवारचा दिवस भारतीय खेळाडू आणि क्रीडाप्रेमींसाठी निराशादायी ठरला. आशियाई सुवर्णपदक विजेता गोळाफेकपटू तेजिंदरपाल सिंग तूर आणि धावपटू जिन्सन जॉन्सन यांना आपापल्या प्रकारातील अंतिम फेरी गाठण्यात अपयश आल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हानसुद्धा संपुष्टात आले.
२४ वर्षीय तेजिंदरपालने हंगामातील सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीची नोंद करताना २०.४३ मीटर लांब अंतरावर गोळाफेक केली. परंतु ‘ब’ गटात त्याला आठव्या, तर ‘ब’ आणि ‘अ’ गट मिळून त्याला १८व्या स्थानावर समाधान मानावे लागले.





