क्रिडा

अर्जेंटिनाचे भवितव्य विश्‍वचषकावरच अवलंबून – लिओनेल मेस्सी

मॉस्को – पाच वेळचा बॅलन डी’ओर पुरस्कार विजेता लिओनेल मेस्सीची ही अखेरची विश्वचषक स्पर्धा असेल यात काही शंका नाही. मात्र मेस्सीचे 2006 पासून फिफा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अजूनही अधुरेच आहे. त्यामुळे यंदा मेस्सी जगभरातील त्याच्या आणि अर्जेंटिनाच्या चाहत्यांचा हिरमोड करणार नाही अशी आशा करायला हरकत नाही. मात्र त्याच मेस्सीने आपल्या फुटबॉल मधील भविष्याबाबात महत्त्वपूर्ण विधान केले आहे.

मेस्सीने यावेळी सांगितले की, विश्‍वचषक स्पर्धेत आमची कामगिरी कशी असेल, आम्ही अंतिम फेरी गाठतो की, अंतिम फेरीच्या आधीच बाहेर पडतो यावर माझे आणि अर्जेंटिनाचे भवितव्य अवलंबून असून आम्ही तीनवेळा लागोपाठ अंतिम फेरी गाठली. मात्र तिन्ही वेळा आम्हाला विजय मिळवता आला नाही. या वेळी अपयशाची ही मालिका आम्ही निश्‍चितच खंडित करू. यावेळी मेस्सीने यंदाचा विश्‍वचषक स्पेन, ब्राझील, जर्मनी, फ्रान्स, आणि बेल्जियमचे संघ जिंकू शकतील असा अंदाज व्यक्‍त करताना सांगितले की, आपण जेव्हा देशासाठी खेळतो तेव्हा स्वतःच्या कामगिरीपेक्षा सांघिक कामगिरी महत्वाची असते. ड गटात असणारा अर्जेंटिनाचा संघ विश्‍वचषकातील आपला पहिला सामना आईसलॅंडच्या संघाविरुद्ध येत्या शनिवारी खेळणार असून त्यानंतरचे त्यांचे सामने क्रोएशिया आणि नायजेरियाविरुद्ध होणार आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button