breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयआरोग्य

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे क्रिडास्पर्धा उत्साहात

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे क्रिडास्पर्धा उत्साहात

पिंपरी-चिंचवड । महाईन्यूज ।

शासकीय जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा २०२२-२३ नियोजन आयोजन सभा-क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र शासन जिल्हा क्रीडा परिषद पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रीडा विभाग पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी ११:३० वा. आचार्य अत्रे रंगमंदिर संत तुकाराम नगर येथे क्रीडा शिक्षक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
सदर कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त.जितेंद्र वाघ, पोलीस उपआयुक्त मंचक इप्पर, उपआयुक्त विठ्ठल जोशी, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, जिल्हा क्रीडा कार्यालय क्रीडा अधिकारी दादासाहेब देवकाते, श्रीकांत हरनाळे तसेच पिं.चि.मनपा क्रीडा अधिकारी अनिता केदारी व क्रीडा पर्यवेक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर भाषणात उपआयुक्त विठ्ठल जोशी म्हणाले, पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही क्रीडा क्षेत्रामध्ये क्रीडा नगरी म्हणून ओळखली जात असून विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन नियोजन व्यवस्थितरित्या करून शहराच्या नावलौकिकात भर टाकण्याचे काम मनपाच्या वतीने करण्यात येत आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच संबंधीत योजनांचा खेळाडूंनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
पोलीस उपआयुक्त मंचक इप्पर म्हणाले, खेळाडूंनी केवळ गुणांसाठी खेळ न खेळता आपले क्रीडा गुण ओळखून क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणे आवश्यक आहे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ म्हणाले, क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळांना देखील राजाश्रय मिळायला लागला आहे. उद्योग नगरी बरोबरच भविष्यात क्रीडा नगरी म्हणून पिंपरी चिंचवड शहराचे नावलौकिक व्हावे असेही ते म्हणाले. मनपाच्या विविध क्रीडा विषयक सुविधांची, प्रकल्पांची माहिती हि त्यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा पर्यवेक्षिका जयश्री साळवे यांनी केले तर सुभाष पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. सभेसाठी पिंपरी चिंचवड शहरातील ४०० शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button