breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

श्री धुंदीबाबा विद्यालय, विद्यानगरमध्ये “ग्रीन कॅम्पस प्रोग्रॅम”अंतर्गत कार्यशाळा उत्साहात

श्री धुंदीबाबा विद्यालय, विद्यानगरमध्ये “ग्रीन कॅम्पस प्रोग्रॅम”अंतर्गत कार्यशाळा उत्साहात

सातारा । महाईन्यूज विशेष प्रतिनिधी ।

दि क्लायमेट रिऍलिटी प्रोजेक्ट इंडिया, नवी दिल्ली या संस्थेच्या माध्यमातून ‘ग्रीन कॅम्पस प्रोग्रॅम’ हा गेल्या दीड वर्षापासून रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाळा व कॉलेजमध्ये राबविला जात आहे. या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश हा शिक्षक व विद्यार्थ्यांना हवामान बदल म्हणजे काय हे शास्त्रीयदृष्ट्या विद्यार्थ्यांसह पालकांना, शिक्षकांना समजावून सांगणे व प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून त्यावरती उपाययोजना करणे व त्यांना याबाबत जागृत करणे होय. ग्रीन कॅम्पस प्रोग्रॅम अंतर्गत हवेची गुणवत्ता, जैवविविधता, उर्जा, पाणी व कचरा व्यवस्थापन या विषयावर शाळा व समुदाय पातळीवर काम केले जात आहे. या विषयांवर काम करून शाळा व कॉलेजमधील कार्बनचे उत्सर्जन शून्य करण्याचा प्रयत्न ग्रीन कॅम्पस प्रोग्रॅम करत आहे.

ग्रीन कॅम्पस प्रोग्रॅम अंतर्गत दि 22 ऑगस्ट 2022 रोजी श्री. धुंदिबाबा विद्यालय विद्यानगरमध्ये शिक्षक प्रशिक्षण उपक्रम उत्साहात पार पडला. यामध्ये क्लायमेट रिऍलिटी प्रोजेक्ट इंडियाचे वरिष्ठ शिक्षण अधिकारी गणेश सातव यांनी शिक्षकांना हवामान बदल – शास्त्र, परिणाम व उपाय यावरती सादरीकरण देवून विषय सविस्तर समजावून सांगितला. याचबरोबर ग्रीन कॅम्पस प्रोग्रॅम अंतर्गत शाळा व समुदाय पातळीवर काम कसे करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेमध्ये शाळेचे मुख्याध्यापक टी. बी. जाधव सर, “ग्रीन कॅम्पस प्रोग्रॅम” शाखा समन्वयक सुनील लांडे तसेच सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.


मानवाच्या विविध कृतींमधून वातावरणामध्ये कार्बनचे मोठ्या प्रमाणात उत्सर्जन होत आहे. वातावरणातील कार्बनचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे जागतिक तापमान वाढ व हवामान बदल होत असल्याचा प्रत्यय आपणा सर्वांनाच येत आहे. मोठ्या प्रमाणात उष्णतेत होणारी वाढ, भीषण दुष्काळ, अतिरिक्त पाऊस व चक्रीवादळे हे याचेच परिणाम होय.

समाजातील प्रत्येक घटकाने हवामान बदल व त्यामुळे होणारे परिणाम थांबविण्यासाठी त्वरित क्रिया करणे आवश्यक आहे. पुढच्या पिढीला स्वच्छ नैसर्गिक स्त्रोत उपलब्ध करून देणे ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे, अशी माहिती “ग्रीन कॅम्पस प्रोग्रॅम” समन्वयक सुनील लांडे यांनी महाईन्यूजला दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button